Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासांत २८,७१८ जणांनी केली कोरोनावर मात , २३,५२९ नवे कोरोनाबाधित

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत देशात २३,५२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २८,७१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,३०,१४,८९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Advertisements

विशेष म्हणजे देशातील अनेक राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी केरळमध्ये देशात आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येपेक्षा अर्ध्याहून अधिक रुग्णसंख्या केरळमध्ये आहे. मंगळवारी देशात १८ हजार ८७० नव्या रुग्णांची नोंद झाली होती तर ३७८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून बुधवारी १२ हजार १६१ रुग्णांची भर पडली तर १५५ जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये काल १७ हजार ८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Advertisements
Advertisements

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी ३,१८७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल ३ हजार २५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६८ हजार ५३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!