Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून मोठा धोका

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली :  देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या  पार्श्वभूमीवर सल्लागार शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आणि ती थोपवता येऊ शकणार नाही, असे  शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी आता लसी अद्ययावत  करणे , लसीकरण कार्यक्रमाला गती देणे  आणि कोरोनाविषयक एसओपीचे पालन करणे गरजेचे असल्याची माहिती वैज्ञानिक सल्लागार केंद्राचे प्राचार्य के. विजय राघवन यांनी दिली आहे.

Advertisements

दरम्यान देशात सर्वत्र कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात यामुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे, असे  डॉ. के विजय राघवन ज्या उच्चस्तरावर करोना व्हायरचा प्रादुर्भाव होत आहे ते पाहता करोनाची तिसरी लाटही थोपवता येणार आहे. पण ही तिसरी लाट कधी येईल हे अद्याप स्पष्ट नाही. पण आपल्याला तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहिले  पाहिजे. लसी अद्ययावत करण्यासाठी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असे  राघवन म्हणाले.

Advertisements
Advertisements

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी होत नाही. गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक ३७८० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार भारतातील कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता २,२६,१८८ इतकी झाली आहे. या दरम्यान ३,८२,३१५ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आता कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ३४८७२२९ इतकी झाली आहे. तर पॉझिव्हिटी रेट २४.८० टक्क्यांवर गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. तर काही राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!