Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : कोरोनाचा ग्राफ पुन्हा वाढला, राज्यात २८ हजारावर रुग्ण तर १३२ मृत्यू 

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई । गेल्या २४ तासांत राज्यात २८ हजार ६९९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण १३२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल ही संख्या ५८ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. दरम्यान राज्यात आज १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २२ लाख ४७ हजार ४९५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७३ टक्क्यांवर आले आहे. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६४१ वर जाऊन पोहचली आहे.

Advertisements

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६४१ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४३ हजार ५९० इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो ३३ हजार १६० इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २६ हजार ५९९ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या २२ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisements
Advertisements

या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ७१० इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ६८६, औरंगाबादमध्ये १५ हजार ३८०, जळगावमध्ये ६ हजार ०८७, अहमदनगरमध्ये ४ हजार ९५९ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५८९ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३३२ इतकी आहे.

दरम्यान आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८५ लाख ८४ हजार ४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ३३ हजार ०२६ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ७७ हजार २६५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ११ हजार ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!