Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : एनसीबी कार्यालयात रात्र काढल्यानंतर रिया भायखळ्याच्या तुरुंगात

Advertisements
Advertisements
Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री  रिया चक्रवर्ती  हिने कालची रात्र एनसीबी कार्यालयात घालवल्यानंतर आज सकाळी रियाची रवानगी भायखळा कारागृहात झाली.  सकाळी १०.३० च्या सुमारास रिया भायखळा कारागृहात दाखल करण्यात आले . मंगळवारी रियाला एनसीबीकडून अटक झाली आणि व्हर्च्युअल सुनावणीच्या माध्यमातून एनसीबीने मागितल्याप्रमाणे १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, तिच्या जामीनावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या तरी रियाला जेलमध्येच राहावे लागणार आहे. रिया चक्रवर्तीवर ड्रग्ज घेणे, सुशांतला ड्रग्ज देणे, शौविक, मिरांडा, दीपेश सावंत याला ड्रग्जसाठी पैसे पुरवणे, ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात असणे असे अनेक आरोपआहेत. दरम्यान, काल रियाला  न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची कोठडी ठोठावली होती. सुशांतच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर यात रियाचे नाव समोर आले होते. तसेच तिने आपण ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!