Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JalnaNewsUpdate : सहायक फौजदाराची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

जालना पोलीस मुख्यालयात एका सहायक फौजदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  सुभाष गायकवाड असं त्यांचं नाव आहे. या घटनेमुळे मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे. सुभाष गायकवाड यांनी मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास पोलिस मुख्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन माहिती घेतली . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे आज सकाळी ८.४५ वाजेच्या  दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. दरम्यान त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली . घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले . मात्र गायकवाड यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास चालू आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!