Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaEffect : गेल्या २४ तासात राज्यातील ११७ पोलिसांना कोरोनाची बाधा, आतापर्यंत १३१ पोलिसांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील कोरोनाबाधितांच्या उपचारात सुधारणा होत असली तरी लोकांचे संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून कार्यरत असणाऱ्या ११७ पोलिसांना  गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाची बाधा झाली असून  दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२ हजार ८७७ झाली आहे. या मध्ये पूर्णपणे बरे झालेले १० हजार ४९१ जण, सध्या उपचार सुरू असलेले २ हजार २५५ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३१ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

Advertisements

राज्यातील १२ हजार ८७७ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ३५८ अधिकारी व ११ हजार ५१९ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार २५५ पोलिसांमध्ये ३०५ अधिकारी व १ हजार ९५० कर्मचारी आहेत. करोनामुक्त झालेल्या १० हजार ४९१ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ४१ व ९ हजार ४५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३१ पोलिसांमध्ये १२ अधिकारी व ११९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!