Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गेल्या चोवीस तासात देशभरात आढळले ६३ हजार ४८९ रुग्ण , ९४४ रुग्णांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या चोवीस तासांत देशभरात ६३ हजार ४८९ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर ९४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ वर पोहचली आहे. देशातील २५ लाख ८९ हजार ६८२ करोनाबाधितांमध्ये ६ लाख ७७ हजार ४४४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले १८ लाख ६२ हजार २५८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ४९ हजार ९८० जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. तसेच, १५ ऑगस्टपर्यंत देशात एकूण २,९३,०९,७०३ नमूने तपासले गेले असून, यातील ७ लाख ४६ हजार ६०८ नमूने काल तपासल्या गेले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!