Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विठ्ठलाच्या दर्शनासाठी परवानगी न देणाऱ्यांना वारकरी संप्रदायाचा विचार समजला नाही – शरद पवार

Advertisements
Advertisements
Spread the love

विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वारकरी परिषदेला लगावला.

Advertisements

आळंदीतील जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यात पवार काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, ‘शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळे त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे आवाहन वारकरी परिषदेने केले होते. वारकरी परिषदेचे वक्ते महाराजांनी त्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले होते. ‘विठ्ठलाला भेटायला पंढरीला जायचे असते. माऊलीच्या दर्शनाला आळंदीला जायचे असते आणि तुकोबांसाठी देहूला जायचे असते. तिथे जायला परवानगी नाही असे कुणी सांगत असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. असा विचार करणारा खरा वारकरी नाही, असे मला वाटते. पण अशा गोष्टी होत असतात. लहान-लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते,’ असे बोलून शरद पवारांनी आपल्या खास शैलीत वारकरी परिषदेचा समाचार घेतला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!