Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur : मामा -भाचीच्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूर शहरामध्ये मामा आणि भाचीचे दुहेरी हत्याकांड उघड झाल्यामुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तात्रय नगरमध्ये हि  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंजुषा जयंतराव नाटेकर  (वय-५५)  आणि अशोक काटे (वय ७० मामा) अशी मृतांची नावं आहे. गेल्या काही दिवसांपासून नात्याने मामा असलेले अशोक काटे हे मृत  मंजुषा यांच्याकडे राहायला आले होते.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुषा नाटेकर या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यांना एक मुलगा आहे. तो पुण्याला राहतो. मंजुषा नाटेकर यांचं घर गेल्या ३ दिवसांपासून बाहेरून बंद होतं. शनिवारी त्या शाळेत गेल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्याने घरीच होत्या. त्यानंतर सोमवारपासून त्या घराबाहेर आल्याचं नसल्याचं शेजाऱ्यांच्या लक्ष्यात आलं. आज तिसऱ्या दिवशी घरातून दुर्गंधी यायला लागली. त्यामुळे घर उघडले असता दुहेरी हत्याकांड झाल्याचं समोर आलं. घर उघडून आत गेल्यानंतर मंजुषा आणि अशोक काटे यांचा मृतदेह आढळून आला. शेजाऱ्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती कळावली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मामा अशोक काटे यांची गळा घोटून  तर मनीषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर  मृतक मंजुषा यांचे पती जयंतराव नाटेकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे संशयाची सुई ही पती जयंत नाटेकर यांच्यावर  प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास चालू  आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!