Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बेलूर येथील मठात मोदींनी केलेल्या राजकीय भाषणावर मठातील साधूंनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद जयंतीदिनी बेलूर येथील रामकृष्ण मिशन मठाला भेट दिली. यावेळी मोदी यांनी मठात झालेल्या भाषणात मोदी यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून विरोधकांवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या त्या भाषणावर मठातील साधू चांगलेच नाराज झाले आहेत. रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादस्पद विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचं बघून खूप वाईट वाटलं. अशी भावना  यावेळी साधूंनी व्यक्त केली. पंतप्रधान दोन दिवसीय कोलकत्ता दौऱ्यावर होते. यावेळी मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्तानं मोदींनी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेल्या बेलूर येथील रामकृष्ण मिशनच्या मठाला भेट दिली होती.

Advertisements

या मठात बोलताना नरेंद्र मोदींनी भाषणात सुधारित नागरिकत्त्व कायद्यावर भूमिका मांडली आणि  विरोधकांवर टीका केली आहे. त्यांच्या या भाषणानंतर माठातील साधूंनी मोदींच्या राजकीय भाषणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वर्गीय स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी संदर्भात भूमिका मांडताना म्हटले आहे कि, “राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादास्पद असलेल्या विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचं पाहून खूप दु्ःख वाटलं” .

Advertisements
Advertisements

मठाचे सचिव स्वामी सुविरनंदा मोदींच्या भाषणाविषयी बोलताना  म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी केलेल्या भाषणावर आम्हाला कोणतेही  मत व्यक्त करायचं नाही. ही अराजकीय संस्था आहे. आम्ही घर सोडून इथे आत्मसंवादासाठी आलो आहोत,” असं ते म्हणाले. तर रामकृष्णच्या एक विद्यार्थी म्हणाला, “मी बेलूर मठ प्रशासनाला मोदींची भेट रद्द करण्याची विनंती केली होती. लोकांसमोर अडचणी निर्माण करणाऱ्या माणसांना बोलवायला नको,” असं त्यानं सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!