Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ संपेना , नोव्हेंबर अखेरीस ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

२०१९ च्या अखेरीस नोव्हेंबर महिन्यात राज्यातील  ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी या आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक आहे. यापूर्वी २०१५ मध्ये महिन्याभरात ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली होती.

Advertisements

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसाना झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ६५५२ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Advertisements
Advertisements

शासनाच्या  महसूल विभागाच्या आकडेवारीतून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात ऑक्टोबरमध्ये आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचंही दिसून आलं आहे. अवकाळी पावसामुळे ७० टक्के खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. यापूर्वी २०१५ मध्ये राज्यात ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण ६१ टक्क्यांनी वाढल्याचंही महसूल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

एकट्या मराठवाड्यात नोव्हेंबरमध्ये १२० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या  असून त्यापाठोपाठ विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात २०१९ मध्ये एकूण २५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१८मध्ये हा आकडा २५१८ इतका होता. अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी लोकांना फटका बसला असून त्यात मराठवाड्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचा समावेश असल्याचं या आकडेवारीत नमूद केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!