Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतला बातमी : वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकरांचे काय झाले ?

Advertisements
Advertisements
Spread the love

कार्यकर्त्यांच्या तोड फोडीचे लोण वंचित बहुजन आघाडीपर्यंत पोहोचले असून वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यापूर्वीच पडळकर वंचितला सोडून जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या  परंतु पडळकर कुठेही गेले नसून ते आमच्यासोबतच असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता परंतु आता मात्र त्यांनी राजीनामा दिला आहे.

Advertisements

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. ते काही दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. ते भाजपच्या तिकिटावर जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत आपण आपली राजकीय भूमिका जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीमधून उमेदवारी देण्यात आली होती. इथे भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत झाली.

सांगलीमध्ये भाजपचे संजयकाका पाटील आणि स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील यांना रिंगणात उहोते.  या निवणुकीत संजयकाका पाटील ५ लाख ८ हजार मते  मिळवून .  विजयी झाले होते . गोपीचंद पडळकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी लक्षवेधी मते मते घेतली होती . लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!