Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे : पावसाचा कहर , दुचाकीसह वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्यात पावसाने कहर केला असून  काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक  नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या अमृता आनंद सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना, पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Advertisements

या घटनेनंतर अमृता सुदामे यांच्या बहीण निशा वायकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “अमृता ही नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजता कामास गेली होती, कामावरून  रात्री १० वाजता घराकडे निघाली. ती साधारण साडेदहा वाजता घरी येणे अपेक्षित होते. मात्र, बराच वेळ झाल्यावरही न आल्याने आम्ही आसपासच्या भागात शोध घेतला. नंतर, पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केल्यावर तब्बल ८ तासांनंतर ‘सनसिटी’च्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर पोलिसांना मृतदेह आढळून आला”. हे सांगताना  निशा यांना अश्रू अनावर झाले. अमृता यांच्या पश्चात  दोन मुली असून पती मुंबई येथे कामानिमित्त गेले असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!