Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bad News : बॅटरी संपल्याने पत्नीचा मोबाइल स्विच ऑफ झाला आणि मोबाईल लागत नाही म्हणून पतीने केली आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

बॅटरी संपल्याने पत्नीचा मोबाइल स्विच ऑफ झाल्याने गैरसमजातून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नामदेव शंकर गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (३० जून) मध्यरात्री करमाड येथे ही घटना घडली.

Advertisements

मिळालेली माहिती अशी की, नामदेव गुंजाळ यांचे पत्नीशी वाद झाला होता. रागाच्या भरात ती माहेरी निघून गेली होती. १० दिवसांनी नामदेवने पत्नीला फोन करून घरी येण्याची विनंती केली. पत्नीने देखील ती मान्य करून ती पुण्याहून औरंगाबादला येण्यास तयार झाली. दरम्यान, नामदेवने पत्नीला कॉल केला असता बोलताना तिच्या मोबाइलची बॅटरी संपल्याने तो स्विच ऑफ झाला. पत्नीने जाणूनबुजून मोबाइल बंद केल्याचा गैरसमजातून नामदेवने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याहून पत्नी घरी आली तेव्हा पतीने गैरसमजातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने तिला मोठा धक्का बसला. याप्रकरणी करमाड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!