Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सीबीआयकडून लाचखोर सीजीएसटी अधिकाऱ्यांवर कारवाई , 10 सप्टेंबरपर्यंत कोठडी

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईत सीजीएसटी लाचखोर अधीक्षकासह दोघांच्या सीबीआयकडून लाच घेतल्या प्रकरणात  एका खासगी व्यक्तीसह तब्बल सात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले असता सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार सीजीएसटीकडील प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 60 लाखांची मागणी केली होती. यामधील 30 लाख रुपये तक्रारदाराकडून हवालामार्फत देण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी सीबीआयने ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील सहा आरोपी हे सीजीएसटीचे वरिष्ठ अधिकारी आहेत.

Advertisements

https://x.com/ANI/status/1832642451317940637

Advertisements
Advertisements

यामध्ये सीजीएसटीचे अतिरिक्त सह आयुक्त, सीजीएसटी आयुक्त, 4 अधीक्षक, 2 सनदी लेखापालासह एका खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. या लाच प्रकरणी सीबीआयने 9 ठिकाणी छापेमारी करत आरोपींविरोधात महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

आरोपींची नावे ….

1. दीपक कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त, सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई पश्चिम
2. सचिन गोकुळका, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
3. बिजेंदर जानवा, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
4. निखिल अग्रवाल, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
5. नितीनकुमार गुप्ता, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
6. राहुल कुमार, सह आयुक्त सीजीएसटी
7. राज अग्रवाल, चार्टर्ड अकाउंटंट
8. अभिषेक मेहता (खाजगी व्यक्ती)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!