Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EVMNewsUpdate : एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करताच पुन्हा चर्चेला तोंड फुटले , राहुल गांधी , आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया….

Spread the love

मुंबई : देशभरात सातत्याने ईव्हीएम मशीनवरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेकदा यावर स्पष्टीकरण देऊन विरोधकांना त्यांचे दावे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. यातच आता जगातील सर्वांधिक श्रीमंतांपैकी एक तसेच टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान इलॉन मस्क यांनी उपस्थित केलेल्या शंकेला राहुल गांधी आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर बोलताना आपल्या पोस्टद्वारे त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित एक बातमीही शेअर केली आहे. त्यांच्यावर EVM मध्ये छेडछाड करुन विजयी झाल्याचा आरोप आहे.

सध्या X वर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी ज्युनिअर यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आहे. रॉबर्ट एफ केनडी ज्युनिअर यांच्या एक्सवरील पोस्टला इलॉन मस्क यांनी रिप्लाय दिला आहे. इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन काढून टाकायला हव्यात. एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. तसेच याचा वापर करू नये, असा सल्लाही एलॉन मस्क यांनी दिला आहे. यावर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “EVM हा भारतातील ‘ब्लॅक बॉक्स’ आहे. त्यांची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते,” अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया ….

यावर आपली प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की , आपण पाहिले की, इलॉन मस्क यांनी ईव्हीएमबद्दल ट्वीट केले. तसेच आम्ही सर्वजण ईव्हीएमबाबत बोलत आहोत. इलॉन मस्क यांचा तंत्रज्ञानाबद्दल एवढा विश्वास असूनही त्यांना ईव्हीएमबद्दल विश्वास नाही. तुम्ही जर फोनवरून ओटीपीने ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकते. आता मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात घोळ झाल्याची चर्चा आहे. यानंतर निवडणूक आयोगाने तेथील सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकांचा भाजपावर प्रचंड राग होता. त्यामुळे भाजपाला लोकांनी २४० वर आणले आहे. ईव्हीएम नसते तर २४० पर्यंतही पोहोचले नसते. भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. एकजण ४०० पारच्या घोषणेबद्दल बोलतो, तर दुसरे आणखी काही बोलतो. आता निवडणूक होऊन गेली आहे. लोकांनी त्यांना जागा दाखवली. इंडिया आघाडी २३७ वर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची पूर्णपणे खात्री मला आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

राजीव चंद्रशेखर यांचा बचाव ….

दरम्यान एलोन मस्क यांना उत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की , यूएस आणि इतर प्रदेशांना हे लागू होऊ शकते जेथे “इंटरनेट-कनेक्टेड मतदान यंत्रे” तयार करण्यासाठी मानक संगणकीय प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. परंतु भारतात असे नाही, जेथे ईव्हीएम सानुकूल-डिझाइन केलेले, सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्क किंवा माध्यमांपासून वेगळे केले जातात.

हे एक मोठे व्यापक सामान्य विधान आहे ज्याचा अर्थ असा आहे की, कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही. त्यामुळे एलोन मस्क यांचे विधान चुकीचे आहे. @elonmusk चे मत यूएस आणि इतर ठिकाणी लागू होऊ शकते – जिथे ते इंटरनेट कनेक्ट केलेले मतदान यंत्र तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात. परंतु भारतीय EVM कस्टम डिझाइन केलेले आहेत. , कोणत्याही नेटवर्क किंवा मीडियापासून सुरक्षित आणि विलग – कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही, ब्लूटूथ, वायफाय, इंटरनेट नाही म्हणजे तेथे कोणताही मार्ग नाही. फॅक्टरी प्रोग्राम केलेले कंट्रोलर जे पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकत नाहीत असे ट्विट केले आहे. राजीव चंद्रशेखर, यांनी मोदी कॅबिनेट 2.0 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!