Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2024 Update : प्रचार संपला , विदर्भातील पाच मतदार संघात १९ एप्रिलला मतदान

Spread the love

नागपूर : लोकसभेच्या राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. गेल्या 17 दिवसांपासून या मतदार संघात प्रचार सुरू होता.

दरम्यान रामटेक : राजू पारवे शिंदे गट वि. श्यामकुमार बर्वे काँग्रेस , नागपूर – : नितीन गडकरी भाजप वि. विकास ठाकरे काँग्रेस, भंडारा गोंदिया : सुनील मेंढे भाजप वि. प्रशांत पडोळे काँग्रेस , गडचिरोली-चिमूर : अशोक नेते भाजप वि. नामदेव किरसान काँग्रेस, चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार भाजप वि. प्रतिभा धानोरकर काँग्रेस अशा या प्रमुख लढती आहेत.

नागपुरात नितीन गडकरी वि. विकास ठाकरे

नागपूर लोकसभेमध्ये भाजपचे नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे अशी लढत होणार आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा काँग्रेसचे सर्व नेते गडकरी यांच्याविरुद्ध एकत्र आले आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यासमोर यावेळी मोठे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. .

दुसरीकडे रामटेकची लढतही यावेळी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे आल्यानंतर या ठिकाणाहून रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज रद्द केला. त्यामुळे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. तर दुसरीकडे शिंदे गटाने काँग्रेसचे नेते राजू पारवे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. राजू पारवे यांना शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्यामध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी मोठी भूमिका निभावल्याचं दिसलं.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!