Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EidNewsUpdate : देशभरात 11 एप्रिलला साजरी होणार ईद तर काही राज्यात उद्याच ईद …

Spread the love

नवी दिल्ली : भारतात 11 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी ईद उल फित्रचा सण साजरा केला जाईल. जगभरात ईदची तयारी जोरात सुरू आहे. भारतात, शव्वाल महिन्याच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी 11 एप्रिल रोजी रमजानचा 30 वा आणि शेवटचा उपवास केला जाईल.

दिल्लीच्या जामा मशीद आणि फतेहपुरी मशिदीच्या इमाम यांनी मंगळवारी (९ एप्रिल) सांगितले की, आज शव्वालचा चंद्र दिसत नाही. भारतात गुरुवारी ईद साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तथापि, देशातील काही राज्यांमध्ये तो गुरुवारी नव्हे तर 10 एप्रिल (बुधवार) रोजी साजरा केला जाईल.

केरळ आणि लडाखमध्ये उद्याच ईद

केरळ आणि लडाखमध्ये ईद गुरुवारऐवजी बुधवारी साजरी केली जाणार आहे. या राज्यांमध्ये सौदी अरेबियानुसार ईद साजरी केली जाते. मनोरमामधील वृत्तानुसार, केरळच्या कोझिकोडचे मुख्य काझी सफार सकाफी, काझी मोहम्मद कोया जमामुल लैली आणि केरळ हलाल समितीचे अध्यक्ष एम मोहम्मद मदनी यांनी ही घोषणा केली. येथे मुस्लिम समाजातील लोकांनी जकात म्हणून गरिबांना तांदूळ वाटले.

 जम्मू-काश्मीरमध्येही उद्या ईद

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्येही उद्या ईद साजरी केली जाणार आहे. काश्मीरचे ग्रँड मुफ्ती नसीर-उल-इस्लाम यांनी जाहीर केले की, येथेही शव्वालचा चंद्र दिसला आहे. लडाखमधील जमीयत उल उलामा इस्ना अशरिया (कारगिल) नेही १० एप्रिलला ईद साजरी करण्याची घोषणा केली आहे. हुजतउल इस्लाम आगा शेख रजा रिजवानी आणि हलाल कमिटीच्या इतर सदस्यांनी सांगितले की, ईदचा चंद्र ९ एप्रिलला अनेक ठिकाणी दिसेल. या आधारावर त्यांनी १० एप्रिल रोजी ईद उल फित्र हा सण साजरा करण्याची घोषणा केली. लडाखमध्ये बुधवारी सकाळी १० वाजता ईदची नमाज अदा करण्यात येणार आहे.

भारतातील इतर भागांमध्ये  ईद 11 एप्रिल रोजी

लखनौच्या मरकाजी चांद कमिटीने सांगितले की, मंगळवारी (९ एप्रिल) ईदचा चंद्र दिसत नव्हता. मुस्लिम धर्मगुरू ईदगाह इमाम मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनी घोषणा केली की आज चांद दिसत नसल्याने ईद आता 11 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.

ईद उल फित्र निमित्त भारतातील सर्व बाजारपेठांमध्ये उत्साह आहे. मुस्लीम समाजातील लोक कपड्यांपासून लहान मुलांसाठी भेटवस्तूंपर्यंत सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. देशभरात ईद उल फित्रचा उत्साह दिसून येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!