Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : या राज्याने घेतला निर्णय , फक्त 99 रुपयात घ्या आता तुमच्या आवडीचा कोणताही ब्रँड…

Spread the love
  • हैद्राबाद : विविध राज्य सरकारमध्ये लोकांना खुश करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. मग लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना असो की, मोफत राशन अथवा मोफत वीज असो. आंध्र प्रदेश सरकारने तर राज्यातील मद्यपी लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. या धोरणानुसार त्यांच्या राज्यातील मद्यपी लोकांना मात्र 99 रुपयात त्यांचा आवडीचा ब्रँड देण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरपासून हे धोरण लागू करण्यात येणार आहे.

अधिक माहितीनुसार आंध्र प्रदेश सरकारने नवीन दारु धोरण तयार केले असून, त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर मद्यपी लोकांना त्यांचा आवडता ब्रँड केवळ 99 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये राज्याच्या नवीन दारू धोरणाला मंजुरी देण्यात आली. नव्या धोरणात राज्य सरकारने सर्व ब्रँडच्या दारूच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर आंध्र प्रदेशातील लोक कोणत्याही ब्रँडची दारू फक्त 99 रुपयांना विकत घेऊ शकतील. नवीन नियम पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

राज्य सरकारचे नवीन धोरण लागू झाल्यानंतर, ग्राहक कोणत्याही प्रस्थापित ब्रँडचा 180 मिली पॅक केवळ 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. आंध्र प्रदेश सरकारने नवीन मद्य धोरण तयार करताना गुणवत्ता, प्रमाण आणि परवडणारीता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.

या नवीन धोरणात इतरही अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. आता आंध्र प्रदेशातील दारू दुकानांना लॉटरी पद्धतीने 2 वर्षांसाठी परवाने दिले जाणार आहेत. सरकारने ही दुकाने उघडण्याचे तासही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर आंध्र प्रदेशात सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत दारूची दुकाने सुरू करता येतील.

दुकानदारांनाही होईल असा फायदा….

नवीन धोरणानुसार, परवाना मिळवण्यासाठी 2 लाख रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल, जे परत केले जाणार नाही. परवाना शुल्कासाठी 50 लाख ते 85 लाख रुपयांपर्यंत चार स्लॅब सेट केले आहेत. 10 टक्के दुकाने ताडी विक्रेत्यांसाठी राखीव असतील. राज्यात 15 प्रीमियम दारूची दुकाने उघडण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यांना 5 वर्षांसाठी परवाना दिला जाईल. नवीन धोरणानुसार, दारू दुकान मालकांना त्यांच्या विक्रीतून 20 टक्के नफा मिळेल.

नवीन दारू धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आंध्र प्रदेशच्या महसुलात सुमारे 2 हजार कोटी रुपयांची मोठी वाढ होईल, असा विश्वास नायडू सरकारला आहे. यासोबतच नवीन धोरणामुळे राज्यातील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल, असे आंध्र प्रदेश सरकारला वाटते. या बदलामुळे राज्यातील दारू तस्करीलाही आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!