Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरला बलात्कार प्रकरणात अटक

Spread the love

बंगळुरु : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरला पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक केली. जानी मास्टर असे या कोरिओग्राफरचे नाव आहे. टॉलिवूड म्हणजेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला तो प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय मुलीने लैंगिक शोषणची तक्रार नोंदवली होती. आता याच जानी मास्टरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंगळुरु पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जानी मास्टर हा टॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.

16 सप्टेंबरला जानी मास्टर या कोरिओग्राफरच्या विरोधात 21 वर्षीय महिलेने तक्रार केली. जानी मास्टरने लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेने केला. या महिलने तक्रारीत म्हटलं आहे की जानी मास्टर मागची सहा वर्षांपासून तिचं शोषण करत होता. आऊट डोअर शुटिंगला गेलो असताना, घरी बोलवून, जवळपासच्या शहरांमध्ये नेऊन जानी मास्टरने शोषण केलं असा आरोप या महिलेने केला आहे.

जानी मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले कोरिओग्राफर शेख जानी बाशा यांना सायबराबाद पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन टीमने (SOT) गुरुवारी (19 सप्टेंबर 2024) गोव्यात अटक केली आहे. आरोपीला हैदराबादला आणले जात असून तो २० सप्टेंबरच्या पहाटे पोहोचण्याची शक्यता आहे. एका महिलेच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर सायबराबाद आयुक्तालयाच्या नरसिंगी पोलिसांनी या व्यक्तीवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर चार दिवसांनी हे घडले आहे .

सायबराबाद एसओटीचे डीसीपी श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. “त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला ट्रान्झिट वॉरंटवर हैदराबादला आणले जात आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर पोलीस पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेणार आहेत. अटकेबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, दोन पथके तयार करण्यात आली होती ज्यांनी जानीचा गोव्यातील एका लॉजमध्ये शोध घेतला. त्याचा माग काढण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेचा आणि तांत्रिक पुराव्यांचा वापर करण्यात आला, असेही ते म्हणाले.

21 वर्षीय कोरिओग्राफरने जानीसोबत काम करण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या सहा वर्षांपासून तिचा छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून या समस्येकडे तेलंगणा महिला आयोग, मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन (MAA) आणि इतरांसह विविध संस्थांकडून लक्ष आणि समर्थन मिळत आहे.

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणातच पॉक्सो कायद्यातंर्गत जॉनी मास्टर ( Jani Master ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कारण जेव्हा महिलेचं शोषण सुरु झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. आता या प्रकरणात जानी मास्टरची चौकशी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. जानी मास्टरच्या विरोधात कलम ३७६ (२), ३२३, कलम ५०६ या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की तक्रार करणाऱ्या महिलेचं शोषण जानी मास्टरने तेव्हापासून सुरु केलं जेव्हापासून ती अल्पवयीन होती. त्यामुळे आता राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरच्या अडचणी वाढल्या आहेत.

जानी मास्टर कोण आहे?

जानी मास्टर हा टॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. जेलर या सिनेमातलं कावाला हे गाणं त्याने कोरिग्राफ केलं आहे.जानी मास्टरने या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलं आहे. तसंच अनेक चित्रपटही त्याने सोडले आहेत. या कोरिओग्राफरने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमधली गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

दरम्यान याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेने  ४० पानांच्या तक्रारीत आपली  आपबिती सांगितली आहे. ही तक्रार राज्य महिला आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. यामध्ये पीडितेने पुराव्यांसह काय काय घडले ते सांगितले  आहे. आता या सगळ्या प्रकरणामुळे जानी मास्टरच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!