Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींच्या चीन बद्दलच्या प्रेमामुळे देशाचे  आर्थिक व भौगोलिक सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात : मल्लिकार्जुन खरगे

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीनबद्दल असलेल्या प्रेमामुळे देशाचे  आर्थिक व भौगोलिक सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच चीनने ताब्यात घेतलेले 75 टक्के भूखंड मोकळे झाले आहे, असे विधान केले आहे. याच परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी एप्रिल 2024 मध्ये चीनने भारताच्या भूमीवर अतिक्रमण केलेले नसल्याचा दावा केला होता.

https://x.com/kharge/status/1834864091225067529?

चीन संदर्भातील विरोधकांच्या प्रश्नांवर परराष्ट्र व्यवहार मंत्री व पंतप्रधान मोदी लोकसभेत मौन बाळगतात व विदेशात जाऊन यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात. गलवानमध्ये शहीद झालेल्या 20 जवानांवर केंद्र सरकारने मौन बाळगून चीनला दोषमुक्त केले. गलवाननंतर चीन उत्पादकांच्या आयातीमध्ये 56 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे देपसांग मैदान, डेमचोक नाला, हॉट स्प्रिंग व गोगरा पोस्ट या भागातील अनेक टेहळणी पॉईंटपासून भारत वंचित असल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. सेबी प्रमुख माधबी बूच यांचे अनेक चीनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात मागे राहिलेल्या नाहीत. चीनसोबत अधिक प्रेम देशासाठी घातक असल्याचे खरगे यांनी एक्स या समाजमाध्यमावर म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!