Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2024 NewsUpdate : उद्धव ठाकरे गटाचे आणखी चार उमेदवार घोषित…

Spread the love

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आणखी 4 उमेदवारांची यादी आज घोषित केली असून आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीत 17 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये
कल्याण मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यतात आली आहे. तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचं तिकीट दिले आहे.

आतापर्यंत घोषित केलेले उमेदवार…

1. बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
2. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
3. मावळ – संजोग वाघेरे-पाटील
4. सांगली -चंद्रहार पाटील
5. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
6. औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
7. उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर
8. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
9. नाशिक – राजाभाई वाजे
10. रायगड – अनंत गीते
11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
12. ठाणे – राजन विचारे
13. मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
14. मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
15. मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
16. परभणी – संजय जाधव
17. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
18. वैशाली दरेकर : कल्याण
19. सत्यजित पाटील : हातकणंगले
20. करण पवार : जळगाव
21. भारती कामडी : पालघर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!