Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VBA NewsUpdate : वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर , बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा तर औरंगाबादची उमेदवारीचीही जाहीर…

Spread the love

औरंगाबाद :वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आज आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने पाच मतदारसंघांतील आपले उमेदवार जाहीर केले असून बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर पुण्यातून वसंत मोरे आणि औरंगाबाद शहरातून अफसर खान यांना यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केली आहे.

वंचितने आज उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघांमध्ये परभणी, नांदेड, औरंगाबाद , पुणे आणि शिरूर या पाच जागांचा समावेश आहे. शिरूरमधून वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे.

मंगलदास बांदल हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते भाजपच्या स्टेजवर दिसत होते. तसेच त्यांनी ४ दिवसापूर्वीच  सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेऊन तिकीटाची मागणी केली होती आणि आज अखेर त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, वंचित आघाडीने आपण महाविकास आघाडीत समाविष्ट होणार नसलो तरी काँग्रेसला राज्यातील सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र आज सुप्रिया सुळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाही वंचितने पाठिंबा दिल्यानेसर्वानीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!