Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रकाश आंबेडकरांचा आघाडीकडून अपमान, पण मी भाजपसोबत असल्याने दलित- बौद्ध मते भाजप आणि महायुतीलाच : रामदास आठवले

Spread the love

मुंबई : भाजपविरोधात अनेक आघाड्या आहेत, त्यांना पिछाडीवर टाकण्याची आमच्यात ताकद आहे. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीने अपमान केला. दिलेला शब्द पाळला नाही, शिवसेनेने जागा दिल्या नाहीत. त्यांनी स्वबळावर लढावे. ते भाजपविरोधात लढले तरी मी भाजपसोबत असल्याने दलित- बौद्ध मते भाजप आणि महायुतीलाच मिळतील हे नक्की, त्यांनी त्यांचा प्रयत्न करावा, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर रामदास आठवलेंनी महायुतीकडील मागण्यांची यादी वाचून दाखवली आहे. केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद,विधानसभेत जागा, महामंडळांमध्ये वाटा आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा, असे रामदास आठवले म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना आठवले पुढे म्हणाले, लोकसभेची जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद आणि विधानसभेत जागा, महामंडळे आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा. आम्ही एनडीए सोबतच आहोत, ईशान्य मुंबईची जागा जिंकू शकलू असतो. पण दोन मित्रपक्ष सोबत आल्याने आमची अडचण झाली आहे. आम्हाला आम्ही मागितलेल्या जागांवर पाणी सोडावे लागले तरी आम्ही पाणी अडवणारे लोक आहोत. पाणी वाहून जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. शिर्डीची जागाही आम्हाला मिळायला हवी होती, मिळाली नाही, पण शिर्डीपेक्षा महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून आणणे आवश्यक आहे. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तर बहुजन समाज समाधानी राहिल.

देवेंद्र फडणवीस हुशार राजकारणी …

आठवले पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे अजित पवारांचे अभिनंदन ते मोठी रिस्क घेऊन आमच्यासोबत आले आहेत. , पवारांना धक्का देऊन अजितदादा आले, उद्धव ठाकरेंना धक्का देऊन शिंदे आले. मोदींच्या नेतृत्वात देश जिंकायचा आहे, आपली ताकद आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. आमची नाराजी दूर झाली, दिलेला शब्द पाळतील असं वाटतंय. जानकर आमचे मित्र, त्यांचं अभिनंदन, मी प्रचाराला जाणार आहे. ते पवारांना भेटून आले, जानकर तिकडं जाऊ नयेत म्हणून फडणवीसांनी त्यांना जागा दिली. देवेंद्र फडणवीस हुशार राजकारणी झालेत. मी पवारांकडे गेलो असतो तर मला जागा मिळाली असती, मी प्रामाणिक आहे, असंसेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!