Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बहुचर्चित अमरावती मतदार संघातून अखेर नवनीत राणा यांना भाजपाची उमेदवारी , बच्चू कडू आणि आडसूळ यांचा मात्र तीव्र विरोध ….

Spread the love

अमरावती: अखेर बहुचर्चित अमरावती लोकसभा मतदार संघातून मित्र पक्षांचा विरोध डावलून अपक्ष खासदार नवनीत राणा यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राणा यांना भाजपाची उमेदवारी दिल्यामुळे महायुतीतील आमदार बच्चू कडू आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव आडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

महायुतीत अमरावतीच्या जागेवरून बरीच रस्सीखेच ही सुरू होती. कारण शिवसेना (शिंदे गट) हे सातत्याने या जागेवर दावा करत होते. मात्र, ती जागा स्वत:कडे खेचून आणण्यात भाजपला यश आलं असून या जागेवर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून नवनीत राणा यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत अपक्ष खासदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बराचसा फायदा झाला होता. कारण त्यावेळी राष्ट्रवादीने तिथे उमेदवार दिला नव्हता. ज्याचा थेट फायदा हा राणांना झाला होता . मात्र, निवडून आल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे भाजपच्या बाजूने झुकले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रामुख्याने मुख्यमंत्री ठाकरेंना घेरण्यात राणा दाम्पत हे सर्वाथ आघाडीवर होते. त्यामुळे मागील पाच वर्ष भाजपसोबत राहिल्याने आता नवनीत राणा यांना भाजपने तिकीट देत त्याच आपल्या अधिकृत उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

नवनीत राणांना शंभर टक्के पाडणार : आ. बच्चू कडू

दरम्यान नवनीत राणा यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि आनंदरराव अडसूळ यांनी विरोध केला होता. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही नवनीत राणांना हा विरोध कायम असणार असून त्यांचा प्रचार करणार नाही. १०० टक्के त्यांना पाडणार असल्याचा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे नवनीत राणांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. अमरावतीतील उमेदवारीबाबत बच्चू कडू यांनी आपले म्हणणे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडले होते. यावर बच्चू कडू म्हणाले, ”पक्षश्रेष्ठींना कल्पना देऊनही काही उपयोग झाला नाही. भापचाच उमेदवार आम्ही देणार आहोत. त्यानुसार शिंदे साहेब फडणवीसांशी बोलत होते” असे त्यांनी सांगितले होते.

जात प्रमाणपत्राचा मुद्दा न्यायप्रविष्ट….

यावर आपली प्रतिक्रिया देताना अडसूळ म्हणाले की, ‘नवनीत राणांच्या विरोधात सगळेच आहेत. बडनेरा ही तिला मतदान करेल की नाही हा एक प्रश्न आहे’. दरम्यान त्याचा प्रचार करावा की नाही. याबाबत आम्ही त्यांना आधीच उत्तर दिले आहे, असे अडसूळ यांनी सांगितले आहे.

त्या निर्लज्ज आहेत. कुठलंही व्यक्तव्य करतात. पण आम्ही आमची लाज शरम विकली नाही. स्वाभिमान विकलेला नाही. आम्ही आहोत तिथे आहोत आणि आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढायचं म्हटलं तर आम्ही लढू शकतो आणि लढणार पण. मी उमदेवार देणार नाही तर मीच उभा राहणार आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेतून उभे राहणार का? यावर अर्थात असे उत्तर अडसूळ यांनी दिले आहे.

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे होता. उद्या त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि निकाल लागला तर काय होणार आहे? असा सवाल देखील अडसूळ यांनी उपस्थित केला. तसेच माझ्या नावाचा भापजला विरोध नव्हता, त्यांना कमळावरती बाईच पाहिजे होती, असा हल्ला देखील अडसूळ यांनी चढवला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!