इंडिया आघाडीची आज मुंबईत महासभा , भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप
मुंबई : गेल्या ६३ दिवसापासून सुरू असलेली राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. दरम्यान, आज दादरमधील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी उपस्थित आहेत. काल चैत्य भूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून यात्रेची सांगता केली.
यानिमित्ताने आज रविवार १७ मार्च रोजी शिवाजी पार्कवर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव, वंचित बाहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.
आम आदमी पार्टी आणि विरोधी आघाडीच्या इतर मित्रपक्षांचे प्रतिनिधीही या रॅलीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा विविध राज्यांतून शनिवारी दुपारी मुंबईत पोहोचली. आज होणाऱ्या सभेत इंडिया आघाडीचे नेते भाजपवर जोरदार निशाणा शाधू शकतात. कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
काल माध्यमांसोबत बोलताना नाना पटोले म्हणाले, देशातील जनता राहुल गांधी यांच्यासोबत आहे. राहुल गांधी यांनी जनतेच्या समस्या समजून घेऊन संपूर्ण देशाचा दौरा केला. त्याला महिला, युवक आणि किसान सभेचा पाठिंबा मिळत आहे. प्रत्येकजण त्यांच्यात सामील होतो. इंडिया अलायन्ससोबतच देशातील सर्व जनतेचा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. संविधान आणि लोकशाहीसाठी ते लढत आहेत.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765