Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दिल्ली दारू धोरण प्रकरणात केसीआर यांच्या कन्या कविता यांना ईडीकडून अटक

Spread the love

नवी दिल्ली : दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता यांना सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादमध्ये अटक केली आहे. के कविता यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे. एजन्सीने कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर काही तासांत ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणेने बजावलेल्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तेलंगणाच्या आमदार कविता यांनी तपास यंत्रणेने त्यांना बजावलेल्या दोन समन्सकडे दुर्लक्ष केले होते.

कविता यांच्या अटकेवर बीआरएस पक्षाचे नेते रवुला श्रीधर रेड्डी म्हणाले की, त्यांनी कवितांना येथून दिल्लीला नेले आहे. जेंव्हा की , के कविता यांनी आधीच ईडीने पाठवलेल्या समन्सला उत्तर दिले आहे. पीएम मोदी हैदराबादमध्ये असताना तुम्ही त्यांना अटक केली आहे . जेंव्हा की , त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. यानिमित्ताने भाजप आणि काँग्रेस बीआरएसला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही कायदेशीर पर्याय शोधू आणि लढू. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

शेवटची चौकशी मार्च 2023 मध्ये झाली होती

ईडीने मार्च २०२३ मध्ये या प्रकरणासंदर्भात शेवटची चौकशी केली होती. कविता यांच्यावर आरोप आहे की , त्या ‘आप’चे संपर्क प्रमुख विजय नायर यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे, ते धोरणे तयार करताना आणि अंमलबजावणीदरम्यान दारू उद्योग व्यावसायिक आणि राजकारण्यांशी संवाद साधत होते.

ईडीने दावा केला होता की के कविता मद्य व्यापाऱ्यांच्या “दक्षिण ग्रुप” लॉबीशी निगडीत होत्या , जे आता बंद झालेल्या दिल्ली अबकारी धोरणांतर्गत मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत होत्या.

के कविता या भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. कविताला ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा भाऊ आणि तेलंगणाचे माजी मंत्री केटी रामाराव कवितांच्या घरी पोहोचले. याशिवाय बीआरएस आमदार हरीश राव हेही कविता यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!