देशात सध्या द्वेष आणि भीतीचे वातावरण – राहुल गांधी

देशात सध्या द्वेष आणि भीतीचे वातावरण असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तरप्रदेशच्या वाराणसी येथे पोहचली आहे.
दरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, मी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेलो. माझ्या प्रवासादरम्यान मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले.
देशातील छोटे व्यापारी त्यांच्या भवितव्याच्या चिंतेत आहेत. उद्या काय होईल याची व्यापाऱ्यांना भीती वाटते. जेव्हा घरात भाऊ भांडतात तेव्हा घर कमकुवत होते. तसेच देशात एकमेकांशी भांडलो तर देशही कमजोर होईल. एकमेकांना जोडून ठेवणे ही देखील देशभक्ती आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765