Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bharat Jodo Nyay Yatra : भाजप आणि आरएसएस पसरवत आहे द्वेष मात्र, या देशाच्या डीएनएमध्ये आहे प्रेम

Spread the love

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला आणि म्हटले की, भाजप भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणत असला तरी देशातील 74 टक्के लोकसंख्या आणि सर्वसामान्य वर्गातील गरीबांना काहीच मिळत नाही. तसेच भाजप आणि आरएसएस द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान ते म्हणाले की, तुम्ही काहीही करा, या देशाच्या डीएनएमध्ये प्रेम आहे.

रायगडमधील केओडाबारी चौकात एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या पक्षाला भावी पिढीसाठी असा भारत हवा आहे जिथे द्वेष आणि हिंसाचार राहणार नाही.

सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष आणि हिंसाचार पसरवला जात आहे. काही लोक म्हणतात की त्यांना, त्यांच्या भाषेच्या आधारावर इतरांना आवडत नाही, काही लोक म्हणतात की ते ज्या राज्यांचे आहेत त्या आधारावर इतरांना आवडत नाही. अशा विचारांनी देश कमकुवत होईल.

मणिपूरबाबत पंतप्रधानांवर हल्लाबोल

राहुल पुढे म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस ) द्वेष पसरवत आहेत, पण या देशाच्या डीएनएमध्ये प्रेम आहे. या देशात विविध धर्माचे आणि विविध विचारांचे लोक शांतता आणि प्रेमाने राहतात. गेल्या वर्षी मे महिन्यापासून शेकडो लोक मरण पावले आणि अनेक घरे जाळली गेली तरीही संघर्षग्रस्त मणिपूरला भेट न दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

दरम्यान राहुल गांधींनी दावा केला की, ईशान्येकडील राज्यात गृहयुद्ध सुरू आहे आणि ते केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. ते म्हणाले की मी तिथे गेल्यावर मेईतेई समुदायातील लोकांनी मला कुकी सुरक्षा कर्मचाऱ्यांना न आणण्यास सांगितले, तर कुकींनी मेईतेई लोकांना तेच सांगितले.

मला प्रेमाचा भारत हवा आहे

प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनात बसलेल्या मुलांना टॉफी देताना राहुल गांधींनी एका मुलीला विचारले की तिला न्याय हवा आहे की अन्याय. मुलीने उत्तर दिले की त्यांना न्याय हवा आहे आणि “मोहब्बत का हिंदुस्तान” हवा आहे कारण तिला भारतावर खूप प्रेम आहे.

अग्निवीर प्रक्रियेवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांचा पक्ष 1 लाख 50 हजार तरुणांना न्याय मिळवून देईल. दरम्यान सर्व संरक्षण कंत्राटे उद्योगपती गौतम अदानी यांना दिली जात असल्याचा आरोपही केला.

राहुल म्हणाले की, जेव्हा मी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा माझे सदस्यत्व रद्द करण्यात आले आणि मला माझे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले. मला त्यांच्या घराची गरज नाही, कारण मी लोकांच्या हृदयात राहतो.

राममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला गरीब माणूस दिसला का?

भाजप भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणतो, पण देशातील ७४ टक्के लोकसंख्या आणि सर्वसामान्य वर्गातील गरीबांना काहीही मिळत नाही. राममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला गरीब माणूस दिसला का? मी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अदानी, अंबानी – हे सर्व मोठे उद्योगपती पाहिले. मला एकही गरीब माणूस दिसला नाही, शेतकरी, मजूर, बेरोजगार व्यक्ती पाहिली नाही. असे देखील राहुल गांधी यांनी या वेळे सांगितले.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १६ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे.

“भारत जोडो न्याय यात्रा १६ फेब्रुवारीला वाराणसीतून उत्तर प्रदेशात दाखल होईल, भारत जोडो न्याय यात्रा १९ फेब्रुवारीला भदोही, प्रयागराज, प्रतापगडमार्गे अमेठीत पोहोचेल, राहुल गांधी अमेठी लोकसभेच्या गौरीगंजमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील. निवेदनानुसार, २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यूपी बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेऊन, भारत जोडो न्याय यात्रा १६ ते २१ फेब्रुवारीपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये राहणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

यात्रा 21 फेब्रुवारीला लखनऊहून उन्नावला पोहोचेल, यात्रा नंतर उन्नाव शहर आणि शुक्लागंज मार्गे कानपूरमध्ये प्रवेश करेल. कानपूरहून हमीरपूरमार्गे झाशीला पोहोचल्यानंतर ती 21 फेब्रुवारीलाच मध्य प्रदेशात प्रवेश करेल.

भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी मणिपूरच्या थौबल येथून निघाली. ही यात्रा 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांत 6,700 किलोमीटरचा प्रवास करेल. 100 लोकसभा मतदारसंघ आणि 337 विधानसभा विभाग आणि 110 जिल्हे व्यापून ते 6,713 किमी अंतर कव्हर करेल. या यात्रेचा 67 दिवसांनंतर 20 मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!