राज्यात गोळीबाराच्या घटना सुरूच, मालेगावमध्ये तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात गोळीबाराच्या घटना सुरूच आहे. आता नाशिकमध्ये देखील गोळीबाराची घटना घडली आहे. मालेगावमध्ये तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. मालेगावच्या ओवाडी नाला भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Advertisements

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन जणांचा खून करण्यात आल्याची घटना घडली असताना आता मालेगावत तरुणावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

शहरातील नॅशनल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ओवाडी नाला भागात एका तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. इब्राहीम शेख असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रमजानपुरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या तरुणाची हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली? हे अद्याप अस्पष्ट झाले नाही.

दरम्यान नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मालेगावात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!