Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Haldwani violence: समाजकंटकांनी केली जाळपोळ 6 ठार, 300 जखमी; उत्तराखंड हाय अलर्टवर

Spread the love

उत्तराखंडमधील हल्दवानी येथे बेकायदेशीर मदरसा आणि मशीद पाडताना हिंसाचार झाला. त्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. नमाज स्थळतोडण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी पोहोचले होते. त्यावेळी समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ सुद्धा झाली. बनभूलपुरा पोलीस स्टेशन समाजकंटकांनी पेटवून दिले.

मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या टीमवर संतप्त जमावाने हिंसक वळण घेतले.

जमावासोबत झालेल्या चकमकीत किमान 100 पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. मदरसा पाडल्याच्या निषेधार्थ जमावाने वनभुळपुरा येथे दगडफेक सुरू केली. जखमी पोलिसांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

येथील हिंसाचार वाढल्याने गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री धामी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.

हल्द्वानीच्या मलिका बगिचा परिसरात मदरसा आणि लगतची मशीद आहे. स्थानिक प्रशासनाने मदरसा आणि मशीद बेकायदेशीर घोषित करून ते पाडण्याचे आदेश दिले. गुरुवारी पोलिस दलासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

बुलडोझरचा वापर करून मदरसा पाडण्याची प्रक्रिया सुरू असताना तेथे जमलेल्या जमावाने खळबळ उडवून दिली. जमाव हिंसक झाला आणि दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत 100 हून अधिक पोलीस जखमी झाले. जमावाने पोलिस स्टेशनच्या बाहेर आणि आत उभ्या केलेल्या वाहनांना आग लावली.

दंडाधिकाऱ्यांनी गोळ्या घालण्याचे दिले आदेश

दुसरीकडे, हिंसाचार पाहता, मॅजिस्ट्रेटने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना, हल्लेखोरांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, मोठ्या मेळाव्यावर बंदी घालण्यासाठी परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत आणि दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पट्रोल बॉम्ब फेकून पोलीस स्टेशन पेटवलं

पोलिसांनी हिंसक जमावाचा नेटाने सामना केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण शेकडोंच्या संख्येने असलेल्या समाजकंटकांनी दगडफेक करुन पोलीस स्टेशन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पट्रोल बॉम्ब फेकून पोलीस स्टेशन पेटवून दिले. पोलीस ठाण्याची भिंत तोडून आरोपी आत घुसले त्यांनी एसओच कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात घुसलेल्या समाजकंटकांच्या हातात पेट्रोलच्या बॉटल होत्या.

महिला पोलीस अडकलेल्या

समाजकंटकांनी पोलीस स्टेशन बाहेर उभी असलेली पोलिसांची वाहन आणि बाइक पेटवून दिल्या. 20 पेक्षा जास्त बाइक जाळल्या. पोलीस स्टेशनच्या आत आणि बाहेर तोडफोड केली. पोलीस अधीक्षक हरीश चंद्र वर्मासह 40 जवान पोलीस स्टेशनच्या आत अडकले होते. यात बहुतांश महिला पोलीस होत्या.

हल्ल्याच्यावेळी महिला शिपाई वायरलेस सेटवरुन घटनेची माहिती उच्चाधिकाऱ्यांना देत होत्या. ‘सर आम्हाला वाचवा….’ असे बोलत असताना लाइन कट झाली. आरोपींनी पोलिस आणि प्रेस लिहिलेली वाहन तोडली, पेटवून दिली.

एकातासात बाजार बंद

बनभूलपुरा क्षेत्रातील वाढता तणाव पाहून मुख्य बाजारातील सर्व दुकान संध्याकाळी सात वाजता बंद झाली. एकातासात सगळा बाजार बंद झाला. यामुळे दहशतीच वातावरण तयार झाले. सर्वप्रथम व्यापाऱ्यांनी कारखाना बाजार, सराफा बाजार, भाजी मार्केट, कपडा बाजार बंद केला. त्यानंतर नैनीताल रोड व बरेली रोडची दुकाने बंद झाली.

न्यायालयाच्या आदेशावरून पथक बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेले

राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतर टीम बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी गेली होती. तेथे समाजकंटकांचा पोलिसांशी वाद झाला. पोलिस आणि केंद्रीय दलाच्या अतिरिक्त कंपन्या तेथे पाठवण्यात आल्या आहेत. आम्ही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कर्फ्यू जागोजागी आहे. जाळपोळ करणाऱ्या दंगलखोर आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

महापालिका आयुक्त म्हणाले – मदरसा आणि प्रार्थनास्थळे बेकायदेशीर आहेत

महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय म्हणाले की, मदरसा आणि नमाजची जागा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यापूर्वी महापालिकेने जवळपासची तीन एकर जागा ताब्यात घेऊन बेकायदा मदरसा व नमाजचे ठिकाण सील केले होते. ही बांधकामे आज पाडण्यात आली.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!