दिल्लीत तरुणीवर तिच्या मित्राने आठवडाभर केला बलात्कार, त्यानंतर अंगावर ओतली गरम डाळ
दिल्लीत एका तरुणीवर तिच्या मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मित्राने पीडितेला मारहाण करत छळ करून तिच्या अंगावर गरम डाळ ओतली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 28 वर्षीय आरोपीचे नाव पारस असून त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 फेब्रुवारीला आरोपीला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी पारस सोबत गेल्या एका महिन्यापासून दक्षिण दिल्लीतील राजू पार्क परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीला पीसीआरला एक पती पत्नीला मारहाण करत असल्याचा फोन आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणीला एम्स रुग्णालयात घेऊन गेले.
पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात नेले असता तिच्या शरिरावर अनेक जखमा होत्या. उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “पोलिसांनी चौकशी केली असता तरुणीने आपण पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगची रहिवासी असून फोनवरुन आरोपीच्या संपर्कात आल्याचे सांगितले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
फोनवरुन बोलता बोलता पीडित तरुणीची आरोपी पारसशी मैत्री झाला होती. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून ते संपर्कात होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पीडित मुलगी बंगळुरुत पोहोचण्याची अपेक्षा होती. तिथे तिला मोलकरणीची नोकरी मिळाली असल्याचे ही पोलिसांनी सांगितले.
तरुणीला बंगळुरुला जाताना दिल्लीहून प्रवास करायचा होता. यावेळी तिने मधे पारसची भेट घेण्याचे ठरवले. भेट झाली असता पारसरने तिला तिथेच राहण्यास सांगितले आणि नोकरी शोधण्यात मदत करणार असल्याचे ही आश्वासन दिले. त्याने शब्द दिल्याने तरुणी त्याच्या सोबत राजू पार्क येथील भाड्याच्या घरात थांबली होती असेही पोलिसांनी सांगितले.
पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले आरोपी पारस तरुणीला मारहाण करु लागला. यानंतर त्याने सलग आठवडाभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असे ही पोलिसांनी तिच्या जबाबाच्या आधारे सांगितले आहे. एकदा तर आरोपीने तिच्या अंगावर गरम डाळ ओतली, ज्यामुळे ती भाजली असे पोलिसांनी सांगितले आहे.
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी 30 जानेवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 376 (बलात्कार) आणि 377 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि 2 फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली. आरोपी पारस हा उत्तराखंडचा असून, दिल्लीत आचारी म्हणून काम करतो असे पोलिसांनी सांगितले आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765