Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रायगडावरून जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे केले जाहीर

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, हा कायदा करण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. १० फेब्रुवारीपासून ही उपोषण सुरू होईल त्यासाठी सरकारकडे १० दिवस आहेत असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisements

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याबाबत आता मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे  पाटील हे आज रायगड येथे गेले. यावरून मनोज जरांगे पाटलांनी आता सरकारला इशारा दिला आहे.

Advertisements
Advertisements

आज रायगड येथे मनोज जरांगे पाटील गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे अद्याप आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, हैद्राबादचे गॅझेट अद्याप स्वीकारण्यात आलेले नाही , समितीच्या कामाने वेग घेतलेला नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आज मराठा समाजाला आणि महाराष्ट्र सरकारला एक महत्त्वाचा संदेश सांगायचा आहे. मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सगेसोयऱ्यांची जी अधिसूचना जारी केलेल्या आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही हरकती-सूचना मागितल्या असल्या तरी तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

पुढील १५ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा आणि सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा. तसेच उद्यापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी तातडीने सुरू न केल्यास 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!