राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येत मशिदीच्या उभारणीचा मार्ग मोकळा

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर बांधलेल्या राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठापणा सोहळा जल्लोषात पार पडला. आता राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मशिदीच्या उभारणीचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन या वर्षी मे महिन्यापासून अयोध्येत भव्य मशिदीचे बांधकाम सुरू करेल. ते पूर्ण होण्यासाठी तीन-चार वर्षे लागण्याची शक्यता आहे.
‘राम जन्मभूमी-बाबरी मशीद’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 9 नोव्हेंबर 2019 रोजी आला. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला पाठिंबा दिला आणि मशीद बांधण्यासाठी पर्यायी भूखंड शोधण्याचा निर्णय दिला होता.
मशिदीबद्दल या टॉप टेन गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?
-
IICF चे मुख्य विश्वस्त जुफर फारुकी यांच्या मते, मशिदीचे अंतिम डिझाइन फेब्रुवारी पर्यंत तयार होईल आणि त्यानंतर प्रशासकीय मंजुरीसाठी जाईल.
-
ही मशीद धन्नीपूर येथे पाच एकर जागेवर बांधणार आहे.
-
या कॉम्प्लेक्समध्ये 200 खाटांचे रुग्णालय, एक सामुदायिक स्वयंपाकघर (‘सार्वजनिक भोजनालय’) आणि एक आधुनिक ग्रंथालय देखील उभारले जाणार आहे.
-
या ठिकाणी एक संग्रहालयही उभारण्यात येणार आहे.
-
याव्यतिरिक्त, IICF या जागेवर एक संशोधन संस्था देखील बांधणार आहे.
-
मशिदीत सौरऊर्जा बसवली जाणार आहे.
-
या मशिदीमध्ये एका वेळी सुमारे 2,000 लोक नमाज अदा करू शकतील.
-
मशिदीची सुरुवातीची रचना ऐतिहासिकदृष्ट्या भारतात बांधलेल्या मशिदींवर आधारित होती परंतु ती नाकारण्यात आली आणि मध्यपूर्वेतील देशांनी प्रेरित नवीन डिझाइन तयार करण्यात आले आहे.
-
सुरुवातीला ही मशीद १५ हजार चौरस फूट जागेवर बांधली जाणार होती, आता ती ४० हजार स्क्वेअर फूट जागेवर बांधली जाणार आहे.
-
प्रस्तावित मशीद आणि इतर इमारतींचा नकाशा 2021 मध्ये अयोध्या विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता आणि मार्च 2023 मध्ये त्याला मंजुरी देण्यात आली होती. आता, मशिदीच्या वृत्त डिझाईनला मंजुरी मिळाल्यास या वर्षी मे महिन्यात बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कुठे उभारलं जाणार हे मशीद?
अयोध्येपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपूरमध्ये ही भव्य मशीद उभारली जाणार आहे. फेब्रवारी 2020 मध्ये ही मशीद उभारण्यासाठी 5 एकरांचा भूखंड देण्यात आला होता. या मशीदीचे नाव मोहम्मद बिन अब्दुल्ला असं असणार आहे.
भारतातील सर्वात मोठ्या आकाराच्या मशिदींपैकी ही एक असणार आहे. अयोध्येमधील या मशिदीमध्ये जगातील सर्वात मोठ्या आकाराचे म्हणजेच 21 फूटांचे कुराण उभारण्यात येणार आहे. पाच मिनार असलेली ही भारतामधील पहिलीच मशीद असणार आहे.
सुमारे 5 वर्षांपूर्वी 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या जमीन वादावर ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीवरील रामललाचे हक्क पूर्णपणे मान्य केले होते आणि त्यांना ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते.
यासोबतच न्यायालयाने मुस्लिम पक्षाला अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन देण्यास सांगितले होते. दरम्यान, आयआयसीएफचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले की, आम्हाला डिझाइनमध्ये अधिक पारंपारिक गोष्टी जोडायच्या होत्या त्यामुळे मशिदीच्या बांधकामाला विलंब झाला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now : 9421379055 | 9028150765