Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का… मिलिंद देवरांचा काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Spread the love

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ) प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे. देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये मिलिंद देवरा म्हणाले, आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आज संपवत आहे. इतके वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.

माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार राहिले आहेत आणि आताही ते याचं मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे २०१४ आणि २०१९ साली या मतदारसंघातून निवडून आले होते.

त्यामुळे मिलिंद देवरा यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होते. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात जाण्याचे निश्चित केल्याची चर्चा होती. त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान मिलिंद देवरा हे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा सुरू होती या वर मिलिंद देवरा यांनी स्पष्टीकरण देत ही ‘अफवा’ असल्याचे म्हटले आहे. तसेच मी माझ्या समर्थकांच्या संपर्कात असून अजून कोणताही निर्णय घेतलेला नसून, जागा वाटपाची चर्चा अद्याप पूर्ण व्हायची आहे त्यामुळे कोणीही दावे करू नयेत असे स्पष्ट सांगितले.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!