Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : नागपूर हिवाळी अधिवेशनात गाजणारे सलीम कुत्ता प्रकरण आहे काय ? आणि येरवडा कारागृहाने काय खुलासा केला ?

Spread the love

नागपूर / पुणे : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तावरून राजकारण चांगलेच तापले आहे.  नाशिकमधील शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेला दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड महंमद सलीम मीर शेख ऊर्फ सलीम कुत्ता गेल्या सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे. सहा वर्षांत एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने सोमवारी दिली. आमदार कैलास गोरंट्याल यांनी सलीम कुत्ता याची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

गेल्या आठवड्यात भाजपचे नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सलीम कुत्ता आणि बडगुजर यांच्यात संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र राणे यांनी सादर केलेली ध्वनिचित्रफीत २०१६ पूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना  भाजप-शिंदे – पवार  सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सलीम कुट्टा यांच्या कथित संबंधावरून सोमवारी विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. शिवसेनेचे (यूबीटी) नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब यांनी सभागृहात गिरीश महाजन यांचे नाव घेत मंत्र्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारला केली. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली.

येरवडा कारागृहाचा खुलासा

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणात सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी सलीम याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो दहा दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता. त्यामुळे विधानसभेत सादर करण्यात आलेली ध्वनिचित्रफीत त्यावेळची असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कुत्ता २०१६ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. या काळात त्याची एकही दिवस कारागृहातून मुक्तता झाली नाही. त्याची मुलगी आणि जावई २०२० मध्ये अधिकृत परवानगी घेऊन त्याला भेटले होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.

कोण आहे सलीम कुत्ता?

सलीम हा मूळचा तमिळनाडूमधील तंजावरधील कुट्टा गावाचा रहिवासी आहे. ९० च्या दशकात तो मुंबईत आला होता. तेथे तो दाऊद टोळीतील गुंड महंमद डोसा याच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आल्या. त्याच्याविरुद्ध कुलाबासह काही पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

महंमद सलीम मीर शेख याची गुन्हेगारी जगतात क्रूर अशी ओळख होती. आक्रमकतेमुळे त्याला सलीम कुत्ता असे टोपणनाव पडले. कुत्ता नावामुळे आपली बदनामी होते असा दावा करून त्याने टाडा न्यायालयात स्वतःच्या नावातून कुत्ता हा शब्द वगळण्याची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली होती.

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल के म्हणाले ?

दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणे हे वेडे झाले असून ते उल्लेख करत असलेला सलीम कुट्टाचा मृत्यू झाल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले. या प्रकरणी माझी खुशाल चौकशी करा, मी 24 तास इथेच असल्याचे आव्हानही गोरंट्याल यांनी दिले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी मागील आठवड्यात दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ता याच्याशी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस गु्न्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर आज 1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. त्यानंतर दुपारी पुन्हा एकदा या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.

दरम्यान कैलास गोरंट्याल यांनी म्हटले की, मी जो सलीम कुत्ता सांगतोय त्याचा 1998 साली मृत्यू झाला आहे. आता नितेश राणे सांगत आहेत तो चुकीचा सलीम कुत्ता आहे. नितेश राणे वेडा आहे. माझी चौकशी करायची करा, मी 24 तास इकडे बसून असल्याचे आव्हान त्यांनी दिले. पण, माझी बदनामी करणार असेल तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.

मात्र, बडगुजर यांनी सलीम कुट्टासोबतच्या संबंधांचे सर्व आरोप फेटाळून लावत हा व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे. हा तपास राजकीय सूडबुद्धीचा भाग असल्याचा आरोप शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटांनी केला. त्यानंतर आता सलीमने भाजप सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांचा कुत्र्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. मंत्री महाजन आणि सलीम कुट्टा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी सरकारकडे केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!