Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : संसदेत गोंधळ उडवून देणाऱ्या आंदोलकांच्या पालकांनी दिली ही माहिती ….

Spread the love

नवी दिल्ली : संसदेत गोंधळ उडवून देणाऱ्या आंदोलक तरुणांना या घटनेत अटक करण्यात आल्यानंतर हे तरुण कोण आहेत आणि त्यांनी हे कृत्य का केले याचा शोध घेत असताना या तरुणांच्या पालकांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या आहेत . यापैकी सर्वच पालकांच्या म्हणण्यानुसार त्यांना या प्रकाराबद्दल कुठलीही माहिती नसून हे तरुण शिक्षित आहेत . 

सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लातूरच्या झरी या गावातील अमोल शिंदे यांच्या पालकांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की , अमोल शिंदे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता. आपल्याला अमोलविषयी अधिकाची माहिती नाही. अमोल आपल्याला भरतीला जातो, असे सांगून गेला. त्याच्या पुढचे काही सांगितले नाही.

अमोल लॉकडाऊनच्या अगोदर एका वेळेस दिल्लीला गेलेला. त्यानंतर वर्षभरात दोन वेळा गेला. याशिवाय तो काही बोलला नव्हता. पोलीस भरती की सैन्याची भरती ते पण  काही सांगितले नाही. तो फक्त म्हणायचा की सैन्यात जायचे आहे. त्याने संसदेत काय केले याची काहीच माहिती आम्हाला नाही.

अमोलचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो पोलीस भरतीचीही तयारी करत आहे. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. आई वडील, दोन भाऊ मजुरी करत आहेत. अमोल देखील मिळेल ते काम करायचा, अशी गावात चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी तो येथून मुंबईला गेल्याची चर्चा देखील गावात आहे. पण पुढे तो कुठे गेला, तो कोणाच्या संपर्कात आला, याची माहिती मात्र कोणालाच नाही. सैन्य भरती आणि पोलीस भरतीचं स्वप्न डोळ्यात ठेवून तो भरतीची तयारी करत होता. मात्र, त्याचं स्वप्न उध्वस्त होत गेलं आणि त्यातून हे घडले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आमचा मुलगा सुखरूप आमच्या जवळ यावा…

दरम्यान, अमोलच्या आईने सांगितले की , अमोल  काहीच सांगत नव्हता. फक्त म्हणायचा की, माझे काम आहे, मी चाललो दिल्लीला, आधी मुंबईला म्हणाला. त्याने मुंबईला गेल्यावर त्याच्या अण्णाला फोन केला की, माझा मोबाईल बंद होणार आहे. मी दिल्लीला जाणार आहे. त्याच्याशी शेवटचा फोन ९ तारखेला झाला होता. ”आम्हाला काहीच समजेनासे झाले आहे. त्यांनं नेमकं केलं तरी काय आहे?. पोलीस सांगतात जाऊ नये तिथं गेला. पण आम्हाला काही कळत नाही. आमचा मुलगा सुखरूप आमच्या जवळ यावा बास्स… तो जर परत आला नाहीतर आम्ही पण मरतो”. असे म्हणून अमोलची आई रडू लागली..

म्हैसूर पोलिसांनी दिली मनोरंजनची माहिती….

आरोपी तरुणाची ओळख पटल्यानंतर दिल्ली पोलिसांनी म्हैसूर पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीची माहिती म्हैसूर पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर म्हैसूर पोलिसांनी मनोरंजनच्या विजयनगर येथील घर गाठले आणि चौकशी सुरू केली आहे. एसीपी गजेंद्र प्रसाद आणि विजयनगर पीआय सुरेश यांनी मनोरंजनचे वडील देवराज गौडा यांच्याकडून त्याची माहिती घेतली.

मुलाला फाशी द्या…

आपल्या मुलाचे कृत्य समजल्यानंतर देवराज गौडा म्हणाले की, मनोरंजनने बी. ई. चे शिक्षण पूर्ण केले आहे. एचडी देवेगौडा यांच्यामुळेच मुलाला बी. ई. चे अॅडमिशन मिळाले होते. तो नेहमी दिल्लीला जायचा. आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्या मुलाने असे का केले, हे मला माहीत नाही. असे कृत्य करणारा माझा मुलगा असूच शकत नाही. त्याने चूक केली असेल तर त्याला फाशी द्यावी.

‘माझा मुलगा प्रामाणिक आहे’

दरम्यान संसदेच्या  गदारोळातील आणखी एक आरोपी मनोरंजन याचे वडील देवराज गौडा म्हणाले की, त्यांचा मुलगा चांगला मुलगा आहे. तो प्रामाणिक आणि सत्यवादी आहे. समाजासाठी काहीतरी चांगलं करावं आणि त्याग करावा एवढीच त्यांची इच्छा होती. तो स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचत असतो.

काय म्हणाली नीलमची आई?

नीलमच्या आईने सांगितले की, आपल्या मुलीला कामाची काळजी होती. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या , “माझी मुलगी बेरोजगारीमुळे त्रासली होती. मी मुलीशी बोललो, पण तिने याबद्दल काहीही सांगितले नाही. नीलम नेहमी म्हणायची की मी सुशिक्षित आहे, पण नोकरी नाही.

सागरच्या कुटुंबीयांनी सांगितले की,

दरम्यान याप्रकरणी सागरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, संसदेत घडलेल्या घटनेत त्याचा सहभाग होता, याबाबत त्यांना काहीही माहिती नाही.

शर्मा हे लखनौच्या रामनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर  शर्मा यांच्यासह दोघांनी शून्य प्रहरात प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि धुराच्या कॅनडलद्वारे पिवळा धूर तेथे पसरवला. त्याला काही वेळातच खासदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. सध्या दोन्ही आंदोलक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

‘माझा मुलगा ई-रिक्षा चालवतो’

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सागरची आई राणी शर्मा म्हणाली, ” सागर  ई-रिक्षा चालवतो. आम्ही आमच्या  कुटुंबात चौघे  आहोत. माझे पती सुताराचे काम करतात. त्यांनी मला सांगितले की तो त्यांच्यासोबत काम करतो. शर्माच्या अल्पवयीन बहिणीने सांगितले, “मी माझ्या भावाला माझ्या आईला सांगताना ऐकले की, काही दिवसांपूर्वी तो दिल्लीला एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, मानक नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी शिव मंगल सिंह म्हणाले, “आम्ही सागरचे वडील रोशन लाल यांना त्यांच्या मुलाबद्दल चौकशीसाठी बोलावले आहे. रोशन सुताराचे काम करतो. हे कुटुंब उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात राहते. पोलिसांनी कुटुंबीयांच्या हवाल्याने सांगितले की सागर शर्मा अलीकडेच बेंगळुरूहून लखनौला परतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!