संसद घुसखोरी प्रकरणात आठ कर्मचारी निलंबित, ५ जणांना अटक

बुधवारी (13 डिसेंबर) संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संसदेत घुसखोरीच्या घटनेत सहा आरोपींचा सहभाग होता, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र या ८ कर्मचाऱ्यांना लोकसभा सचिवालयाने निलंबित केले आहे. संसद घुसखोरी प्रकरणात सहापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाती सागर शर्मा (26), मनोरंजन डी (34), अमोल शिंदे (25), नीलम आझाद (42), आणि विशाल शर्मा या आरोपींना अटक करण्यात अली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला राजस्थानच्या नीमराना येथे फरार आरोपीचे देखील लोकेशन सापडले, त्यानंतर जेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा तो तेथून फरार झाला. सध्या दोन विशेष पथक आरोपी ललित झाच्या शोधात आहेत. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, संसदेत घुसलेले हे सहा जण दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले. संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती
या प्रकरणी लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक अनिश दयाल सिंह या समितीचे नेतृत्व करणार आहेत. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समितीमध्ये इतर सुरक्षा एजन्सींचे सदस्य आणि तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेतील त्रुटीचे कारण शोधून कारवाईची शिफारस करणे हे समितीचे काम असणार आहे.
काय घडले होते?
आरोपींनी घुसखोरीचा कट केल्यानंतर सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी शून्य प्रहरात प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि स्प्रे फवारून घोषणाबाजी केली. त्याचवेळी संसद भवन बाहेर अमोल शिंदे आणि नीलम यांनी देखील स्प्रे फवारत घोषणाबाजी केली. ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या. सागर, मनोरंजन, अमोल आणि नीलम पोलिसांच्या ताब्यात आहेत. संसदेत पोहोचण्यापूर्वी हे चौघेही विशालच्या घरी थांबले. सहावा आरोपी ललित हा फरार आहे.
ParliamentNewsUpdate : संसदेत गोंधळ उडवून देणाऱ्या आंदोलकांच्या पालकांनी दिली ही माहिती ….
महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
For News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765