Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SuicideNewsUpdate : आयएएस-आयपीएस बनण्याची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या …

Spread the love

नागपूर : शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. एका हॉटेलच्या खोलीत या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने सर्व प्रकार समोर आला. शुभम सिद्धार्थ कांबळे असे या २५  वर्षीय तरुणाचे  नाव आहे. तो मूळचा वर्मानगर, गंगाखेड, परभणी येथील रहिवासी होता. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहिली होती. यामध्ये त्याने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितले  आहे.

आयएएस-आयपीएस अधिकारी होता न आल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले  आहे. त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचाही उल्लेख त्याने चिठ्ठीत केला आहे. दरम्यान २५  नोव्हेंबरला कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये केली होती. त्याच्या सीडीआरवरून तो नागपुरातील राजहंस हॉटेलमध्ये असल्याची माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली.

गंगाखेड पोलिसांनी राजहंस हॉटेलमध्ये विचारपूस केली. यानंतर तरुण रूमचा दरवाजा उघडत नसल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रूमचा दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडून आत पाहिले असता तो तरुण मृतावस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, त्यानी रासायनिक पदार्थांचे  सेवन करून आत्महत्या केली असल्याचे  समोर येत आहे. तसेच  समोर आलेल्या माहितीनुसार, हा तरुण नोकरी करत नव्हता, तो अविवाहित होता. तसेच मिळालेल्या कागदपत्रावरून तो मागील एक वर्षापासून मानसरोग तज्ञांकडून उपचार घेत असल्याचेही पोलिसांनाप्राथमिक तापासात आढळून आले असून अधिक तपास चालू आहे.

दुसऱ्या एका घटनेत अमरावतीमध्ये मायलेकाची आत्महत्या

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत अमरावतीमध्ये एका आईनेच आपल्या मुलाला विष दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमागील कारण भावुक करणारं आणि मनाला चटका लावणारं आहे. यात १२  वर्षीय मुलाला विष पाजून आईने स्वतःही विष घेतलं. दोघांचाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या महिलेच्या पतीचं वर्षभरापूर्वीच निधन झाले  होते . पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी महिलेला बरीच ओढातान करावी लागत होती. परिस्थिती गरीबीची होती. त्यामुळे मुलाचं संगोपनही शक्य होत नव्हतं. याच परिस्थितीला कंटाळून महिलेनं टोकाचे पाऊल उचलले असे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!