Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdaate : ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच , महापालिकेची मंजुरी …

Spread the love

मुंबई : अखेर मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्क दिल्यामुळे यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा  दसरा होणार आहे.  दरम्यान या आधीच शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने  शालेय शिक्षण  मंत्री दीपक केसरकर यांनी आम्ही अर्ज मगे घेतल्याची महिती दिली होती त्यावर आज महापालिकेने शिक्कामोर्ताब करीत  ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद अखेर मिटला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवागनी मिळाली आहे. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवतीर्थवर होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर आज महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली.

ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी “हा नैतिकतेचा विजय आहे. महापालिकेने यापूर्वीच विचार करुन याआधीच परवानगी द्यायला हवी होती. पण उशिरा का असेना पण मनपाने शहाणपण दाखवलं. परवानगीमध्ये जो तांत्रिक भाग होता, त्यानुसार अर्जदाराचा पत्ता सेनाभवनाचा होता. सेनाभवनातूनच आपण पत्रव्यवहार करतो. तो आम्ही यापूर्वीच केला होता. गेल्या वर्षीही कोर्टाने आम्हाला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शिस्तप्रिय शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा होईल”.

शिंदेंचं एक पाऊल मागे, ठाकरेंचा मार्ग मोकळा?

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी शिंदे गट शिवाजी पार्क नाहीतर क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर दसरा मेळावा घेणार असल्याचे  वक्तव्य आधीच केले होते . त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कसाठी केलेला अर्जही शिंदे गटाने  मागे घेतला होता. शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्यानंतर ठाकरेंचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर आज महापालिकेने  दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा निर्णय निकाली काढला.

दरम्यान, शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या शिंदे गटाने  घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!