Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Israel Palestine War Updates: हादरले इस्रायल : 600 ठार , हजारो जखमी , तेल-अविवच्या रस्त्यावर सन्नाटा , उड्डाणे रद्द, गाझावर हवाई हल्ला…

Spread the love

तेलअवीव : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत इस्रायलच्या 300 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे दीड हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर गाझाच्या 232 लोकांचा मृत्यू झाला आणि 1790 लोक जखमी झाले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार , हमासने सुमारे 164 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले असून इस्रायलच्या हद्दीत हमासच्या अनेक सैनिकांनी घुसखोरी केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अधिकृत युद्ध घोषित केले आणि शत्रूंना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हमासच्या अतिरेक्यांनी गाझा पट्टीतून 2 हजारांहून अधिक रॉकेट डागले. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी एक टॉवर उद्ध्वस्त केला. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, हमासने हवाई आणि सागरी सीमेवरून 7 ठिकाणांहून घुसखोरी केली आणि त्यांचे सैनिक हमासच्या सैनिकांशी लढत आहेत. दुसरीकडे, हमासने 5 हजार रॉकेट डागल्याचा दावा केला आहे.

’22 ठिकाणी चकमक सुरू’

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिचर्ड हेच म्हणाले, “इस्रायलमध्ये 22 ठिकाणी लढाई सुरू आहे.” लष्कराने गाझा पट्टीतील 7 भागातील लोकांना घरे सोडून निवारागृहांमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आहे. लष्कर येथे हमासच्या ठाण्यांवर हल्ले करत आहे.

‘इराणमध्ये शस्त्रे पुरवली’

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, इस्रायल डिफेन्स अँड सिक्युरिटी फोरमचे सल्लागार डॅनियल सीमन म्हणाले, “सकाळी 6.30 च्या सुमारास हमासने इस्रायलच्या दिशेने एक हजाराहून अधिक रॉकेट डागले. त्यांनी इस्रायली लष्करी चौक्यांवर हल्ला करून त्यांच्या सैनिकांना ठार केले. याशिवाय हमासच्या दहशतवाद्यांनीही अनेक लोकांना ओलीस ठेवले होते. इस्रायलवर डागलेली रॉकेट इराणकडून मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. किमान 2000 जखमींवर इस्रायलच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इस्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे की नौदलाने हमासच्या सात सैनिकांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर हल्ला केला, त्यानंतर ते जिकिम बीचवरून पळून गेले. अल जझीराच्या वृत्तानुसार, रविवारी पहाटेही इस्रायलचा गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरूच होता. अल जझीराच्या रिपोर्टरने सांगितले की गाझा शहरावर हवाई हल्ल्यांचे आवाज येत असून  या हवाई हल्ल्यात किती जणांना जीव गमवावा लागला आहे, याची माहिती सध्यातरी मिळालेली नाही.

इस्रायलने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. इस्रायल हमासच्या स्थानांना लक्ष्य करत आहे. बहुतेक लोक संयुक्त राष्ट्रांनी बांधलेल्या शाळांमध्ये लपलेले आहेत. इस्रायली लष्कराने हमासच्या हल्ल्यात एक इस्रायली कमांडर ठार झाल्याचे म्हटले आहे. केरेम शाहलोम भागात हमासच्या अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल जोनाथन स्टेनबर्ग मारला गेला आहे. केरेम शाहलॉग हे एकमेव चेकपॉईंट आहे जिथून गाझा आणि इस्रायलमध्ये प्रवेश आणि बाहेर पडता येते.

हमासने दावा केला आहे की,

त्याने डझनभर इस्रायलींना ओलिस घेतले नाही, परंतु त्यांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. हमासच्या लष्करी शाखेच्या प्रवक्त्याने सांगितले की, पकडण्यात आलेल्या सर्व इस्रायलींना गाझा पट्टीच्या विविध भागात ओलीस ठेवण्यात आले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे राजधानी तेल-अविवला जाणारी डझनभर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकन एअरलाइन्स, एअर फ्रान्स, लुफ्थांसा, एमिरेट्स, रायनएअर आणि एगिन एअरलाइन्स यांनी तेल-अविव उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी वेस्ट बँकमध्ये शांतता आणि स्थैर्याबद्दल चर्चा केली आहे. हमासच्या माध्यमातून इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध करतो, असे ब्लिंकन यांनी महमूदला सांगितले आहे. तेल अवीवच्या रस्त्यांवर शांतता आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारवर दबाव आहे. हमासच्या हल्ल्यानंतर बहुतांश लोकांनी शेल्टर होममध्ये आश्रय घेतला आहे. मात्र बहुतांश लोक भीतीपोटी घराबाहेर पडत नाहीत.

दरम्यान युनिसेफ या मुलांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे की, ते इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मुलांबद्दल खूप चिंतित आहेत. शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचे युनिसेफने म्हटले आहे. त्यामुळे आम्ही सध्या मुलांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहोत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!