Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaNewsUpdate : भाजप – काँग्रेसमध्ये पोश्टर वॉर , मोदींची तुलना मोहम्मद तुघलकशी , काँग्रेसवर बंदी घालण्यची मागणी …

Spread the love

नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटरवर चांगलेच पोश्टर युद्ध रंगले आहे . भाजपने राहुल गांधी यांना रावण म्हटल्यानंतर आता काँग्रेसच्या केरळ युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोहम्मद तुघलकशी केल्यामुळे भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी (७ ऑक्टोबर) निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली.

त्याचे झाले असे की , केरळ काँग्रेस युनिटने एक पोस्टर जारी केले होते ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना तुघलक साम्राज्याचा दुसरा सुलतान मुहम्मद बिन तुघलक यांच्याशी करण्यात आली होती. केरळ काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पोस्ट केले आहे. खरं तर, भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ‘काँग्रेस’ची मान्यता रद्द केली पाहिजे आणि पक्षावर बंदी घालावी, असे म्हटले आहे.

केरळच्या काँग्रेस युनिटने ट्विटरवर पोस्ट केले होते की पीएम मोदी, जर तुम्हाला पाठ्यपुस्तके अद्ययावत करायची इच्छा असेल, तर कृपया तुघलक काळ तुमच्या युगाने बदला. यासोबतच काँग्रेसने पीएम मोदींच्या फोटोसह एक पोस्टर जारी केले होते, ज्यामध्ये पीएम मोदींची तुलना मोहम्मद बिन तुघलकशी करण्यात आली होती. याआधी भाजपने मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर फिल्मी स्टाईलमध्ये एक पोस्टरही शेअर केले होते, ज्यामध्ये ‘रावण – काँग्रेस पार्टीची निर्मिती’ असे लिहिले आहे. डायरेक्टर जॉर्ज सोरास.’ या पोस्टमध्ये भाजपने हंगेरियन-अमेरिकन उद्योजक जॉर्ज सोरास यांच्यावरही निशाणा साधला आहे.

पोस्टरमध्ये राहुल गांधींचा रावणाच्या रूपातील फोटो शेअर करताना भाजपने नव्या युगाचा रावण असे लिहिले आहे. तो दुष्ट, धर्मविरोधी आणि रामविरोधी आहे. भारताचा नाश करणे हे त्याचे ध्येय आहे. यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी पलटवार करत भाजपचा प्रयत्न राहुल गांधींविरोधात हिंसाचाराला चालना देण्याचा असल्याचे म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!