Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : सिक्कीम मध्ये ढगफुटी , सेनेचे २३ जवान बेपत्ता …

Spread the love

सिक्कीम : उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने तीस्ता नदीला पूर आला. यामध्ये लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शोध मोहीम सुरू आहे. या दुर्घटनेत खोऱ्यातील काही लष्करी आस्थापनांना फटका बसला आहे. ढग फुटल्यानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यावर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग सिंगताम येथे पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

लष्कराची वाहनेही बुडाली

गुवाहाटीतील संरक्षण पीआरओ याबाबत माहिती देताना म्हटले आहे की , चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक १५ -२०  फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली आणि त्यात  लष्कराचे २३ जवान बेपत्ता तर ४१ वाहने चिखलात बुडाल्याचे वृत्त आहे.

भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया म्हणाले, “सरकारी यंत्रणा कामाला लावून लोकांचे प्राण वाचवले जात आहेत, ज्याचा अहवाल येणे बाकी आहे. यात कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही, परंतु सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

थरळी येथील सोल परिसरात रात्री उशिरा ढग फुटी

यापूर्वी १८  ऑगस्ट रोजी उत्तराखंडमधील चमोलीच्या थराली भागात मुसळधार पावसानंतर ढग फुटल्याची घटना समोर आली होती. ढगफुटीनंतर प्राणमती नदीची पाणीपातळी धोक्याच्या चिन्हावरून वाहू लागली आणि पिंडर नदीलाही उधाण आले. नद्यांचे पाणी लोकांच्या घरात आणि शिवमंदिरात शिरले होते. यामुळे मोठे नुकसान झाले. अनेक घरांचे नुकसान झाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!