Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : महिलांना सरसकट आरक्षण न देता एससी / एसटीलाही यात स्थान असावे : सोनिया गांधी

Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारने नव्या संसदेत बिल आणल्यानंतर या बिलावरून गेल्या ७ तासापासून सरकार आणि विरोधक यांच्यात घामासान चालू आहे. महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यासाठी ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या चर्चेत भाग घरातनं त्यांनी महिला आरक्षणाला समर्थन दिले आसले तरी त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाची करून देशाचे लक्ष वेढलेले आहे. हे आरक्षण सरसकट सर्व महिलांना न देता एससी, एसटी आणि ओबीसी महिलांनाही त्यांच्या टक्केवारीनुसार आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी यावेळी बोलताना केली आहे.

सोनिया गांधी यांनी संसदेत अत्यंत कमी वेळात आपले म्हणणे मांडले . अगदी थोडक्यात त्यांनी महिला आरक्षणावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महिला आरक्षणाचे समर्थन करतानाच महिलांना आरक्षण देताना आरक्षणात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. महिला आरक्षणात एससी, एसटी आणि ओबीसींनाही आरक्षण दिलं पाहिजे. सरसकट आरक्षण देऊ नका, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच हे विधेयक मंजूर झाल्यास राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांनी आरक्षणात आरक्षण देण्याची मागणी करून भाजपची कोंडी केल्याचं सांगितलं जात आहे.

15 लाख महिला निवडून आल्या

यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की , मी महिला आरक्षणाच्या विधेयकाचं समर्थन करते. या विधेयकाचं समर्थन करण्यासाठी मी इथे उभी आहे. हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांची भागीदारी निश्चित करणारं विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी लोकसभेत मांडलं होतं. त्याचाच हा परिणाम आहे. देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थात 15 लाख महिला निवडून आल्या आहेत. राजीव गांधी यांचं स्वप्न आता अर्धच पूर्ण झालं आहे. हे बिल मंजूर होताच राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याने काँग्रेस या विधेयकाचं समर्थन करते.

महिलांवर अन्याय होईल

हे विधेयक मंजूर होण्याचा आम्हाला आनंद आहे. तशीच चिंताही आहे. गेल्या 13 वर्षापासून महिला राजकीय जबाबदारी मिळण्याची वाट पाहत आहेत. त्यांना अजून वाट पाहायला लावली जात आहे. दोन वर्ष, चार वर्ष आणि सहा वर्ष किती वर्षाचा ही प्रतिक्षा असावी? हे विधेयक लगेच मंजूर करावं ही आमची मागणी आहे. मात्र, त्यापूर्वी जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. एससी एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाची या आरक्षात व्यवस्था केली जावी. सरकारने या गोष्टी केल्यानंतरच जी पावलं उचलायची ती उचलावीत. आमचं काही म्हणणं नाही. या विधेयकाला विलंब करणं म्हणजे महिलांवर अन्याय करणं होईल, असंही त्या म्हणाल्या.

निशिकांत दुबे उभे राहताच गोंधळ

सोनिया गांधी यांचं भाषण झाल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आपलं म्हणणं मांडलं. निशिकांत दुबे उभे राहताच काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. महिला खासदारांनीच सोनिया गांधी यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं, अशी मागणी यावेळी काँग्रेस खासदारांनी केली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले. पुरुष महिलांच्या समस्या मांडू शकत नाही का?, असा सवाल अमित शाह यांनी केला. त्यानंतर निशिकांत दुबे यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. माझी आई एम्समध्ये भरती आहे. त्यामुळे मला आपलं म्हणणं मांडण्याची आधी संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दुबे यांना बोलण्याची संधी देण्यात आली.

सकाळपासून सुरु आहे चर्चा

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर सलग तीन तास जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी विरोधकांवर प्रश्न उपस्थित करत असून विरोधक सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी महिला आरक्षणाची मागणी केली आहे.

राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही : स्मृती इराणी

स्मृती इराणी यांनी सभागृहात सांगितले की, काँग्रेसचे म्हणणे आहे की, हे विधेयक यूपीए सरकारच्या काळात राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते, जेव्हा हा कायदा लागू होईल तेव्हा महिलांना 15 वर्षे आरक्षणाची हमी दिली जाईल. या विधेयकासाठी मी पंतप्रधान आणि कायदामंत्र्यांचे अभिनंदन करतो. संविधानाशी छेडछाड करणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे. संविधानाचा ग्रंथ आपल्यासाठी पूजनीय आहे. राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही.

सुप्रिया सुळे यांनी काढली भाजपची मानसिकता

दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजप नेते निशिकांत दुबे म्हणाले की, महिलांचा अपमान करणार्‍यांच्या आणि अपमानास्पद गोष्टी बोलणार्‍यांच्या बाजूने भारताची आघाडी आहे. महाराष्ट्रात भाजपचा एक नेता आहे ज्याने टीव्हीवर माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” घरी जा, अन्न शिजवा, देश दुसरा कोणी चालवेल, ही भाजपची मानसिकता आहे…”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!