AurangbadNewsUpdate : मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषित केले ४५ हजार कोटी
औरंगाबाद: तब्बल 7 वर्षांनंतर औरांगाबाद शहरात आयोजित करण्यात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैंठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी 59 हजार कोटीच्या योजनांची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की , मराठवाड्यासाठी आज सिंचनाबाबत मोठा निर्णय घेतला असून , यातील 14 हजार हे नदीजोड प्रकल्पाचे असून 45 हजार कोटी निव्वळ मराठवाड्यासाठी आहेत.
मराठवाड्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मराठवाड्यात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी देखील फडणवीस मुख्यमंत्री असतांना ही बैठक झाली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की , केवळ राज्यातच नव्हे तर देशात मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकजण म्हणतात फक्त घोषणा होतात. पण, आतापर्यंत आमच्या मंत्रीमंडळाने सर्वसामान्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कोणकोणत्या विभांगासाठी किती निधीची तरतूद?
“सार्वजनिक विभागामध्ये 12 हजार 938 कोटी 85 लाख रुपये, पशू संवर्धन, दुग्ध विकास, मत्स व्यवसायासाठी 3 हजार 318 कोटी 54 लाख, नियोजन 1 हजार 608 कोटी 28 लाख, परिवहनवर 1 हजार 128 कोटी 69 लाख, ग्रामविकासवर 1 हजार 291 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, वैद्यकीय शिक्षण 488 कोटी, महिला आणि बालविकास विभाग 386 कोटींची तरदूद केली”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“शालेय शिक्षण 490 कोटी, सार्वजनिक आरोग्य 35 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगरविकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटीस, पर्यटन 95 कोटी, मदत-पुनर्वसन 88 कोटी, वनविभाग 65 कोटी, महसूल विभाग 63 कोटी, उद्योग विभाग 38 कोटी, वस्त्रोद्योग 25 विभाग कोटी, कौशल्य विकास 10 कोटी, विधी आणि न्याय 3 कोटी 85 लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतलाय”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले .
याशिवाय संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठण आणि तीन नद्यांवरचे पूल याबाबतही निर्णय घेतला. त्याचबरोबर सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय, धाराविशमध्ये वैद्यकीय शिक्षण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन घेणं याबाबतचे निर्णय घेतले आहेत”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की , बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही 31 निर्णय घेतले होते. 2017 मध्ये यातील 10 विषय मार्गे लागले होते. तर आज घडीला यातील 23 विषय मार्गी लागले असून, 7 विषय प्रगतीपथावर आहेत. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.