Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबाद शहराला छावणीचे स्वरूप , वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह साडेसात हजार पोलीस रस्त्यावर …

Spread the love

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन , मंत्रिमंडळाची बैठक आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराला कडेकोट बांदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले आहे . पोलीस पुढील चार दिवस हे सर्व पोलीस रस्त्यावर असतील. यामधे साडेसात हजार पोलिसांचा समावेश आहे. या पोलीस बंदोबस्तात 10 पोलीस अधीक्षक व अप्पर अधीक्षक, 30 उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

पुढील चार दिवस औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रम होत आहे. जात 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सव आहे. सोबतच 17 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्र नायडूधनंजय चंद्रचूड , सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई, कर्नाटक, मद्रास खंडपीठातील न्यायमूर्ती, देशाचे अतिरिक्त महाअधिवक्ता शहरात असणार आहे. तर, मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात असणार आहे. या सोबतच सर्व आमदार आणि उच्चपदस्थ अधिकारी देखील शहरात असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद सह इतर सहा जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

मोर्चेकरी आंदोलकही सज्ज

दरम्यान शहरात होणाऱ्या कार्यक्रमावर करडी नजर ठेवण्यासाठी हा बंदोबस्त सल तयारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची झेड प्लस सुरक्षा कायम आहे यात बुलेटप्रूफ वाहन, अन्य दहा वाहने, जामर, एनएसजी कमांडो, यासह 55 कर्मचाऱ्यांचा सुरक्षा कवच असणार आहे. याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातूनही अनेक अधिकारी , पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहेत. यामध्ये 10 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक
30 सहाय्यक आयुक्त/उपाधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक , 400 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक यांच्यासह 2800 महिला पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. यासोबत 20 वाहतूक कर्मचारी, 150 होमगार्ड, 500 एसआरपीच्या 4 तुकड्या,6 बॉम्बशोधक नाशक पथक बंदोबस्तावर राहणार आहेत.

स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त

याशिवाय औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त बंदोबस्तावर असणार आहे. पाच सहाय्यक पोलीस आयुक्त बंदोबस्तावर असणार आहे. 25 वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा देखील बंदोबस्तात सहभाग असणार आहे. 96 पोलीस सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह औरंगाबाद शहर पोलीस दलातील 3 हजार 200 पोलीस सलग तीन दिवस बंदोबस्तात असणार आहे.

आंदोलनासाठी निवेदने

मंत्री मंडळ बैंठकीच्या निमित्ताने विविध संघटना आणि पक्षांतर्फे आतापर्यंत 73 आंदोलन आणि 18 आत्मदहनाचे निवदेन प्रशासनाकडे आले आहेत. तसेच 8 जणांनी मोर्चे, 5 उपोषण, आणि 3 अर्ज धरणे आंदोलनासाठी आले आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्री मंडळाची बैठक होत आहे. गेल्यावाळी तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली होती. त्यावेळी मोर्चेकरी शिक्षक आणि पोलिसात झालेल्या वादानंतर पोलिसांनी शिक्षकांवर लाठीचार्ज केला होता. आता सात वर्षांनी होणाऱ्या या मंत्री मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर 73 अर्ज आंदोलनासाठी आले आहेत. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे. वेगवेगळ्या 6 जिल्ह्यातून पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला आहे. सोबतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 हजार अश्रुधुराच्या नळकांड्या सज्ज ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही संख्या 4 हजारांवर असायची, मात्र आता अतिरिक्त 4 हजार नळकांड्या ठाणे येथील शस्त्रागार विभागातून मागवले गले आहेत. यापैकी 2 हजार दाखल झाल्या असून आणखी 2 हजार दोन दिवसांत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..

पैठण तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी (15 सप्टेंबर) पैठण ते औरंगाबाद मराठा आरक्षण पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे.

पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सकाळी दहा वाजता मराठा आरक्षण पायी दिंडी औरंगाबादकडे मार्गस्थ होणार आहे. दिंडी पिंपळवाडी, धनगाव, ढोरकीन मार्गे बिडकीन येथील अंजली लॉन्स येथे दिंडी मुक्कामी थांबणार आहे. शनिवारी दिंडी बिडकीन येथून सकाळी सहा वाजता औरंगाबादकडे निघणार आहे. चितेगाव, गेवराई तांडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, रेल्वेस्टेशन मार्गे मंत्रिमंडळ बैठकीच्या स्थानी नेण्यात येणार आहे. लोकशाही मार्गाने दिंडी जनजागरण करीत निघणार असून या दरम्यान दिंडीसोबत वाहन व ध्वनीक्षेपक राहणार आहे. पायी दिंडी मोर्चात समाजबांधवांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!