Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप विषारी साप , त्याला तामिळनाडूतून हाकलण्याची गरज , उदयनिधीचा पुन्हा हल्ला बोल …

Spread the love

चेन्नई : तामिळनाडूचे क्रीडा मंत्री आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या विधानानंतर आता  भाजपची तुलना विषारी सापाशी केली असून त्याला तामिळनाडूतून हाकलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. उदयनिधी यांच्या या विधानावरूनही गदारोळ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप नेते आधीच हल्लाबोल करत आहेत.

कुड्डालोर जिल्ह्यातील नेवेली येथे द्रमुकचे आमदार राजेंद्रन यांच्या कौटुंबिक लग्नाला उपस्थित राहण्यासाठी उदयनिधी येथे आले होते. येथील जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर हल्लाबोलच केला नाही तर त्यांचा मित्रपक्ष अण्णाद्रमुकवरही निशाणा साधला. उदयनिधी यांनी एआयडीएमकेची तुलना सापांना आश्रय देणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याशी केली. हा कचराही राज्यातून स्वच्छ करावा लागेल, असे ते म्हणाले.

काय म्हणाले उदयनिधी?

तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी म्हणाले, ‘कचऱ्यातून साप रेंगाळतो आणि आमच्या घरात घुसतो. सापांचा नायनाट करायचा असेल तर कचराही शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे २०२४ मध्ये तामिळनाडूतून भाजप आणि अण्णाद्रमुकला हटवण्यासाठी लोकांनी तयार राहावे. ते म्हणाले, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही गुलामांची पॅकिंग केली आहे.  आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना त्यांच्या मालकांना घरी पाठवायला हवे.

याच कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हेही दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत द्रमुकला तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील सर्व 40 जागा जिंकण्याची गरज आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तरच आपण नवीन सरकारमध्ये मोठी भूमिका बजावू शकू.

फोटो शेअर करत भाजपवर हल्लाबोल केला

त्याचवेळी उदयनिधी यांनी सनातन धर्मावरील वक्तव्यावर भाजपच्या हल्ल्यांना एका छायाचित्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर डास , मच्छर जळणाऱ्या कॉईल चा फोटो शेअर केला आहे. . हे चित्र त्यांच्या त्या विधानाकडे बोट दाखवत आहे ज्यात त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. या विधानावर भाजप नेत्यांसह अनेक धर्मगुरूंनी आक्षेप घेतला होता.

उदयनिधी म्हणाले होते, ‘काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या दूर करता येतात. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते पुसून टाकायचे आहे. त्याचप्रमाणे सनातनलाही नष्ट करायला हवे.

सनातन धर्माविरुद्ध बोलत राहणार : उदयनिधी

सनातन धर्मावरील वादाबाबत उदयनिधी म्हणाले की, भविष्यातही या विषयावर बोलत राहीन. ते म्हणाले की, तामिळनाडूमध्ये गेल्या 100 वर्षांत सनातन धर्माविरोधात आवाज उठवला जात आहे. आम्ही पुढील 200 वर्षे याबद्दल बोलत राहणार आहोत. उदयनिधी म्हणाले की, सनातन धर्मावरील त्यांचे विधान नवीन नाही. ते म्हणतात की डॉ . बाबासाहेब आंबेडकर ,  पेरियार आणि एम करुणानिधी या विषयावर बोलले आहेत.

यांनी पुढे म्हटलेले आहे की , या महापुरुषांच्या सनातन धर्माच्या विरोधामुळे महिला घरातून बाहेर पडू शकली आणि सती प्रथा बंद झाली.  ते म्हणाले की, द्रमुकची स्थापना त्याच तत्त्वांवर झाली आहे, जे अशा समाजकंटकांना विरोध करतात. भाजपने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत काही गोष्टी पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!