Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आरक्षणावरून राजकीय नेते आणि सत्ताधाऱ्यांची नौटंकी , प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

Spread the love

मुंबई : जालना जिल्ह्याच्या आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाच्या दरम्यान, विविध पक्षांचे नेते आंतरवली सराटी येथे जाऊन आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करून राजकीय नेत्यांची आणि सत्ताधाऱ्यांची नौटंकी चालू असल्याचे म्हटले आहे.

याबाबत केलेल्या आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की , हाय कोर्टाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असताना, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण ह्या तथाकथित मराठा नेत्यांना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सुप्रीम कोर्टात गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का टिकवता आले नाही?

त्यांची आंतरवली सराठी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासने ही सर्व नौटंकी आहे. तसे नसते तर त्यांनी ‘रयत मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण’ ह्या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न केले असते, ताकद उभी केली असती, धोरण बदलायला दडपण आणले असते.

उलट निजामी मराठा नेत्यांच्या भेटी मुळे ओबीसी आणि रयत मराठ्यांच्या मध्ये तणाव वाढला आहे.

सर्व रयत मराठ्यांना माझे आवाहन आहे. ह्यातून दंगल न घडवता ही मार्ग निघू शकतो. निवडणुकीत जाती आधारित नाही तर मानवी मूल्यांवर, न्याय्य मागण्यां साठी भूमिका घ्या. ह्याच मार्गाने आपल्या आरक्षणाची मागणी कोणत्याही समाजाला न दुखावता प्रभावी पध्दतीने पुढे रेटता येईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!