Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इस्रोने शेअर केला चांद्रयान-3 प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरल्याचा व्हिडिओ…

Spread the love

इस्रोने चांद्रयान-3 प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरल्याचा व्हिडिओ केला शेअर…

(Chandrayaan-3) चांद्रयान-3 चे प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर उतरल्याचा व्हिडिओ इस्रोने शेअर केला आहे. हा व्हिडिओ विक्रम लँडरमधील लँडर मॉड्यूल कॅमेऱ्याने काढलेला आहे.

23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 मिनिटांनी ‘चांद्रयान-3’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले होते. यानंतर काही तासांनी त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले.

प्रज्ञान रोव्हर आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या रासायनिक रचनेची तपासणी, चंद्राची माती आणि खडकांची तपासणी असे अनेक प्रयोग करणार आहे. या तपासणीकहा डेटा रोव्हर लँडरला पाठवेल आणि लँडर तो डेटा पृथ्वीवर परत पाठवेल.

24 ऑगस्टला रात्री इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये  लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या थोडा पूर्वीचा व्हिडिओ आहे. याच व्हिडिओच्या थ्रेडमध्ये इस्रोने आज नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे.

प्रज्ञान रोव्हर द्वारे आता 14 दिवस विविध प्रकारचे संशोधन सुरू राहणार आहे.

 

प्रज्ञान रोव्हर काय आहे? 

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, रोव्हर हा एक लहान, मोबाईल रोबोट आहे जो शास्त्रज्ञला चंद्र आणि ग्रहांवर त्यांच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणि ती जागा एक्सप्लोर करण्यासाठी पाठवतात.

रोव्हर तापमान रीडिंग, खडक आणि मातीचे नमुने घेऊन ग्रहाची छायाचित्रे घेऊ शकतात आणि ग्रहाविषयी माहिती देखील गोळा करू शकतात.

त्यानंतर ही माहिती रोव्हर, रेडिओ सिग्नलद्वारे पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना पाठण्याचे काम करतो. रोवरमुळे लोकांना अंतराळात न पाठवता दूरच्या ठिकाणांबद्दल माहिती मिळवणे सुप्पे झाले आहे.

भारताने रचला इतिहास

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा इतिहास रचला आहे. भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा नवा विक्रम झाला आहे. चांद्रयान-3 हे चंद्रावर 14 दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे.

 


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!