Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Chandrayan-3 NewsUpdate : जगात मान उंचावणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेचा खर्च आहे तरी किती ?

Spread the love

नवी दिल्ली : भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली असून विक्रम लँडरने चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. ४ वर्षापूर्वी भारताची चांद्रयान २ ही मोहीम अपयशी ठरली होती.मात्र या निमित्ताने  जगाला हेवा वाटेल असं यश भारताने संपादित केलं आहे. इस्रोने या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ही मोहीम फत्ते केली आहे. एखाद्या आंतराळ मोहिमेवरील हा सर्वात कमी खर्च आहे. रशियाच्या लुना २५ या मून मिशनचं बजेट १५०० कोटी रुपयांहून अधिक होतं.

इस्रोने ६ जुलै रोजी चांद्रयान-३ मोहीम लाँच करणार असल्याची माहिती दिली. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान अंतराळात पाठवलं जाईल असं इस्रोने जाहीर केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी इस्रोच्या वैज्ञानिकांनी श्रीहरीकोटा येथील लाँच पॅडचं निरीक्षण केलं. त्यानंतर १४ जुलै रोजी चांद्रयान-३ मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून दुपारी २.३५ वाजता जीएसएलव्ही मार्क ३ (एलव्हीएम ३) हेवी-लिफ्ट लाँच व्हीकलद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग का केलं?

भारताचं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा पहिलाच देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आंतराळ यान उतरवणं हे सर्वात अवघड आहे. येथे तापमान उणे २३० उंश सेल्सिअस इतकं आहे. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि प्रमुख खनिजे असल्याचा दावा केला जातो. केवळ याच कारणासाठी इस्रोने आपलं यान दक्षिण ध्रुवावर उतरवलं आहे.

चंद्राच्या विषुववृत्तीय भागावरच आतापर्यंत अनेक अंतराळयाने उतरण्यामागे काही कारणे आहेत. चीनचे चँग-ई ४ (Chang’e 4) हे अंतराळयान विषुववृत्ताच्या पुढे जाऊन उतरणारे पहिले अंतराळयान ठरले होते. चँग-ई ही चीनची चंद्रमोहीम असून त्यांच्या चांद्रसंशोधन कार्यक्रमातील दुसरा टप्पा होता. ही बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. तर विषुववृत्ताजवळ उतरणं सोपं आणि सुरक्षित असल्याचं मानलं जातं. येथील भूप्रदेश आणि तापमान हे सहन करण्याजोगे आणि उपकरणांसह शोधमोहीम करण्यास दीर्घकाळासाठी अनुकूल असणारे आहे. येथील पृष्ठभाग अतिशय सपाट असून उंच टेकड्या किंवा पर्वत जवळपास नाहीत. तसेच मोठ्या खळग्यांचेही प्रमाण येथे खूप कमी आहे. याठिकाणी सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो, कमीतकमी पृथ्वीच्या बाजूने असणाऱ्या भागावर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना नियमितपणे ऊर्जेचा पुरवठा होतो.

याउलट चंद्राचा ध्रुवीय प्रदेश अधिक कठीण आहे. येथील भूपृष्ठभाग सपाट नाही. येथील बरेच भाग पूर्णपणे अंधारात असून तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुव आणखी गडद अंधारात आहे. याठिकाणचे उणे २३० अंश सेल्सियस पेक्षाही कमी तापमान असते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि अत्यंत कमी तापमानामुळे उपकरणांकडून काम करणे अवघड होते. याशिवाय दक्षिण ध्रुवावर काही सेंटिमीटर्सपासून ते काही हजार किलोमीटर्सपर्यंत विविध आकारांची विवरे आहेत.

आता पुढचं लक्ष्य काय?

दक्षिण ध्रुवावर विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवाय, अत्यंत थंड तापमान असल्यामुळे याठिकाणी अडकलेली एखादी वस्तू काहीही बदल न होता, अनेक वर्षांनंतरही गोठलेल्या अवस्थेत मिळू शकते. विवरांत जीवाश्म आढळल्यास त्यांच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळातील घडामोडींवर प्रकाश टाकता येऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. २००८ साली भारताने राबवलेल्या चांद्रयान-१ मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!